१८ फेब्रु, २०१०

मनाचिये गुंती ---- आठ

"दहाच ऑफिस होतं, म्हणून मी सकाळी एक तास अगोदरच निघाले. साप्ताहिकाच्या  लेखाचा आणी मेन स्टोरीचा सर्व भार माझ्यावरच असतो पण या वेळेस सरानी काहीही विषय दिला नव्हता. मग सुरुवात तरी  काय आणी कुठून करणार.
९.३० ला ऑफिस मध्ये पोहचल्यावर पाहिले की अविनाश सर दोन तास अगोदरच आले होते " साधनाच्या एक वर्ष्याच्या कामकाजात असे कधी घडले  नव्हते

" गुड मोर्निंग सर " सराना पाहताच साधना उत्तरली
 थोड मागे  वलून आणी छोटसं हसू ओठांवर ठेवून अविनाश बोलले

" हाय , अछा तर ही वेळ आहे तुमची येण्याची तर"
 " माझ्या गैरहज़िरित सुद्धा माझ्या ऑफिसचं काम थांबणार नाही हे नक्की" थोडसं मस्करी करत आणी  काही पावले पुढे  येत अविनाश बोलला.

त्यांच्या चेहरयात वेगळीच चमक दिसत होती. जणू  त्यांच्यातला  अविनाश एका नव्या रुपात नव्या बहरात आला असावा हेच ते रूप जे पहिल्या वहिल्या प्रेमात प्रतेक माणसाला आपल्यात जाणवत. साधना ही काहीशी अशीच नव्या बहरात आली होती जेव्हा तिला प्रशांतच्या  प्रेमाचा साक्षात्कार झाला होता.

आपल्या केबिन कड़े वळत  साधना तिच्या भूतकाळ:आत  रमली.
दररोज ऑफिस सुटल्यावर चौपाटीवर फिरने, हाथात हाथ घेवुन त्या बेसुमार वाहनारया समुद्राच्या लाटाना तुडवत तिथून फिरने जणू  त्यांच्या  प्रेमाची ग्वाही ते  त्या समुद्राला देत. दररोज नवनविन फुलांचे गुच्छ कदाचित साधनाच्या  टेबलावर दररोज असणारी नवनवीन ताज़ी  फुलं येण्याची सुरुवात इथूनच झाली होती. कोण्या महापुरुषाला एका दैवीशक्तीचा आविष्कार घडावा तसा त्या दोघाना  तेव्हा एकमेकांच्या प्रेमाचा आविष्कार घडला होता.
माहीत नाही कुठे माशी शिंकली आणी अचानक दोन आठवड्यापूर्वी त्या समुद्राजवळच प्रशांतने भेटायला बोलावले तेव्हा ना त्याच्या जवळ माझ्यासाठी फुले होती ना कुठे त्याच्या डोळ्यात ते प्रेम

" काय झालं प्रशांत इतक्या तातडीने का बोलावलस." त्याचा चेहरा समुद्राच्या लाटांचा वेध घेत होता. आणी साधना फक्त त्याकडे पाहून काहीतरी चुकिच घडणार  आहे  याचा चंग बांधत होती.

" साधना ..." मागे वळत  तो बोलत होता " अगं घरातल्यानी माझं लग्न ठरवले आहे."
साधना  स्तब्ध होती. त्याचे डोळे जमिनीच्या दिशेने होते. साधनाला विश्वास बसत नव्हता की हा तोच प्रशांत आहे ज्याने माझ्या नज़रेत नज़र भिडवून सांगितले होते की माझ तुझ्यावर प्रेम आहे आणी आज
"मग ...हे तूझ्या घरात्ल्यानी ठरवल ना! तू काय ठरवल आहेस "
या उलट वाक्याची आपेक्ष्या त्याने केली नव्हती पण आलेल्या प्रश्नाच उत्तर काय देऊ याचाच विचार त्याने जवळ जवळ दोन मिनिट केला. तिच्याकडे न पाहता तो मागे फिरला. समुद्राचा खारा वारा  त्याना अधून मधून ओळख दाखवत होता पण आज याची  जाणीव दोघाना ही नव्हती.
" वेळ प्रसंगी मी माझ्या  घरात्ल्यान्च्या विरोधात जावून लग्न करें, पण तुझ्याशिवाय लग्न करणार नाही. ही तुझीच वाक्य  होती ना. आता काय झालं. कुठे गेलं तुझं ते प्रेम ......" तिला  मध्येच थांबवत प्रशांत बोलला की
" तो सर्व बालिशपना होता आता आपल्याला आपल्या भविष्याबद्दल विचार करावा लागेल. तुझी जागा माझ्या आयुष्यात कोणी घेवुच शकत नाही पण माझी फॅमिली जीने मला लहानाचं मोठं केलं त्यांचे काही हाक्क आहेत की नाहित, त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करणार नाही तर कोण "

हे ऐकताच साधनाचे डोळे पाणावले होते  "  भविष्याचा विचार.  तो विचार करताना  तर मी फक्तं तुझा विचार केला होता आयुष्यामध्ये कधीच कोणावर विश्वास ठेवला नव्हता तेव्ह्डा तुझ्यावर ठेवलाय. भविष्याही तूच होतास. पण तू कदाचित मला तुझ भविष्या समजलं न्व्ह्तासं" तिचे भिजलेले डोळे अणि थरथरनारे ओठ पाहून  एक  क्षण प्रशांत थबकला

"साधना माझ्या हाथात काहीही नाहिये आपण एकमेकाना विसरलेलच बरं. be  practical "

हे बोलून प्रशांत तिला एकटीलासोडून निघून गेला . पुन्हा एकदा एकटेपणाची झळ  तिच्या आयुष्याला लागली होती. तीच्या डोळ्यातला पुर संपता संपत नव्हता."

" excuse  me  mam , "
हे शब्द ऐकताच साधना दचकली. आणी तिला कलुन चुकलं  की ती अत्ता त्या दिवसापासून कितीतरी लांब आली आहे जिथे ती आणी फक्त तिचे विश्व आहे. तिने वर पाहिलं

" अरे चंदू  तू , काय झालं ? "

चंदू साधनाच्या ऑफिस मध्ये काम करणारा एक मुलगा होता.
".... तुम्हाला अविनाश सर बोलावत आहेत."

" हा.. हो तिकडेच  जाण्यास निघाले होते मी. "

साधना अविनाशच्या  केबिन कड़े जाण्यास निघाली.
अविनाश फोन वर बोलत होता. फोनवर बोलता बोलता त्याने एक नज़र त्याच्या दिशेने येनारया साधनाकड़े पाहिलं. आणी का कुणास ठावुक त्याची नजर तशीच तिच्या मूर्तिमंत चेहरयाकड़े पाहत राहिली . कदाचित साधनाला ही ते जाणवलं असावं. म्हनुनच की काय ती सुध्हा थोड़ी लाजरी बुजरी झाली. ती काही बोलणार तेव्हड्यात अविनाशने तिला नजरेने आत येण्याचा इशारा केला. ती आत जावून खुर्चीत बसली. तेव्हड्यात तिचं लक्ष्य तिथेच असलेल्या गुलाबाच्या फुलांवर गेले. आणी थोड़ी ती हसली

  तिला कालचा सर्व प्रकार आठवला. तिने फक्त तिचे विचार मांडले होते. पण हे विचार एखाद्या व्यक्तीमध्ये एव्ह्दा बदल घडवून  आनु शकतात. हे तिला पटत नव्हते.