१२ फेब्रु, २०१०

मनाचिये गुंती ----- सात

अविनाश मुजुमदार नाव जसं वजनी होतं तसं हे व्यक्तिमत्त्वं ही तसच आणी तेवढच वजनी. आत्ता पर्यंत कधी ऑफिस मध्ये कोणी मान वर करून अविनाशशी बोलले नव्हते, आणी आज
" ही कोण कुठली माझ्याकडून दिल्याजानारया वेतनावर जगनारी writer   माझ्या विचारांवर   टिकास्त्र कसे सोडू शकते."
डोक्यातला कलहं वाढतच जात होता. राग येत होता पण कुठे तरी साधना जे काही बोलली ते डावलन्यासारखे  नव्हते.
आपली भलीमोठी गाडी चालवताना एव्हाना अविनाशला गर्व असे की माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी रस्त्याने चालनारया प्रत्येक माणसाच्या नजरा माझ्याकडे खेचू शकतो. पण आज एका फुलाची महती साधनाने ज्यापध्हतिने सांगितली ती पद्धत अविनाशच्या त्या गर्वाला इतक्या खाली ठेचकलुन दिले की तिथे अविनाशचा झालेला अपमान ही अविनाशला त्याच्या वेगलेपणाची  जाणीव करून गेला.


बंगल्यात गाडी पोहचताच अविनाशने त्याच्या हातातील bag  सुंदर नावाच्या त्याच्या नोकराकड़े दिली. आणी सरळ जावून हॉल मधल्या एका सोफ्या वर जावून पहुडला. थोडासा थकवा जाणवत होता, पण डोळे बंद करताच साधनाचे ते उलट शब्द कानाजवळ गर्दी करत होते .


"काय चुकत आहे माझे.  मी ज्या पधातीने जगत आहे, ते की मी स्वता चुकत आहे .  नाही  नाही आज मझ्या जवळ जे काही आहे. ते मी जो काही आहे तसं कमावलं आहे. मी चुकुच शकत नाही. आणी राहिलं त्या फुलांच तर its  just part of   profetionalism . ती फुलं पाहून ही मी खुश आहेच की. मग का त्या फुलांचा अट्टाहास " अशी मनाची समजूत घालून,  थोडसं  पुढे होवून अविनाश फ्रेश होण्यासाठी निघाला तोच त्याची नजर तिथेच टेबलावर असलेल्या मोती च्या फोटो फ्रेम वर गेली. पुढे जाउन अविनाशने त्या फ्रेमवर हाथ फिरवला आणी काही वेळातच त्याचे डोळे पानावले.


मोती अविनाशचा पाळीव कुत्रा ज्याने अविनाशला जवळ जवळ तीन वर्ष्य साथ दिली पण त्या तीन वर्ष्यात त्या मुक्या प्रान्याने लावलेल्ल्या लळयाने अविनाश पुरता भिजला होता. मोत्याशिवाय अविनाश कधीही जेवायचा नाही की त्याला पाहिल्याशिवाय तो कधी ऑफिसला ही जात नसे. मोत्याच्या बाबतीत ही असेच अविनाशला पाहिल्याशिवाय तो झोपत  नसे. अविनाशच्या येण्याच्या वेळेस बंगल्यात  तो येरझर्या घालत असे. हे मोत्याचे चमत्कारिक वागने फक्त अविनाशसाठीच असे. पण कुठे माशी शिंकली आणी फक्त एकदा लाडाने नंदिनिच्या अंगावर उडी  मारल्याने  तिची कीमती साडी फाटली होती. आणी याची शिक्षा म्हणून नंदिनी ने त्याला कुठेतरी लांब तिच्या एका मैत्रिणीच्या घरी पाठवून दिलं होतं आता माहीत नाही  तो नेमका कुठे आहे. पण जाताना अविनाशच्या नज़रेला एक नज़र भिडवून  तो गेला होता ती नजर जणू अविनाशला संगत होती की " मला जायाच नाहिये " " जे काही झालं ते माझ्या प्रेमाचा भाग होता पण तू ओळखलच नाहीस, जास्त काही नाही पण मी दिलेलं प्रेम तरी दाखवायचसं "




" त्याने भरभरून दिलं पण मी त्यावेळी त्याची ती घाभरलेली नज़र ओळखु शकलो  नाही, कदाचित त्याच्यापेक्षा मला नंदिनीचं प्रेम मोठं वाटलं असावं "  अविनाश स्वताला अपराध्यासारखे मानत होता. प्रेमात गफलत करने माणसाचा गुणधर्म  तो पनाला लावणे म्हणजे तारे वरची कसरत हीच कसरत चुकवावी म्हणून माणूस मागे पुढे न पाहता  " हाजिर तो वजीर " या संकल्पनेनुसार स्वताला कोणत्या व्यक्तिपासून नफा आहे ते पाहून विचार करणं काही चुकिच नाही


"तुम्ही  इथे आहात"
पाठीमागून आलेला नंदिनिचा आवाज़ ऐकून अविनाशने डोळे पुसले आणी वलून  पाहिलं

" कित्ती वेळ वाट पाहिली तुमची आणी तुम्ही इथे "

" सॉरी ... तुला फ़ोन करून संगनाराच होतो पण ..."

"विसरलात ....हं हं .... मी तुमची लग्नाची बायको आहे. हे कधी विसरु नका म्हणजे मिळवली"

अविनाश साठी  हे सर्व नविन नव्हतं . दररोज  त्याची अन नंदिनिची या ना त्या कारनावरून  वादावाद होतं असे .

" झालं तुझं.  माझं डोकं दुखत होतं म्हणून मी घरी आलो. तुला फोन करत होतो पण कदाचित तू पार्टीमध्ये  busy होतीस"
अविनाश  काहिश्या रागा रागाने तिच्याशी बोलत होता. " पटत नसेल तर मोबाइल वरचे miss call ची लिस्ट पहा "

हे ऐकल्यावर खाजील होउन नंदिनी आतमध्ये गेली. आणी अविनाश पुन्हा आपल्या विचारांमध्ये रमून गेला.

------------

इकडे साधना आणी प्रो . मराठे. रात्रीची जेवण झाल्यावर गप्पा मारण्यासाठी बाल्कनीत आले. बिल्डिंग मधील काही मुलं  खाली खेळत होती.


" किती निरागस आहेत ही मुले, यांच्या भावितव्यात काय काय वाढून ठेवलय कुणास ठावुक" काहिश्या सूचक शब्दातून साधना बोलली.
" त्यातच तर  खरी मज़ा आहे, माणसाला पुढे काय होणार आहे माहीत नसतं. पण तरीही शंकांच काहुर तो आपल्या आजुबाजुला ओढावून  घेतो. आणी पूर्ण आयुष्याभर त्या शंकांच निरसन करत राहतो. ना तो जगतो, आणी ना त्या लोकाना जगु देत, जी त्याच्या या शंकांचा घटक असतात."

साधना तत्परतेने हे सर्व ऐकत होती. आणी तेव्हा तिने मराठेना तिच्या ओफ्फिसमध्ये घडलेली गोष्ट सांगितली.
हे ऐकून ते हसले आणी म्हणाले

" छान! ... असच स्वताला आणी स्वताच्या विचाराना लोकांपर्यंत पोह्च्वत जात जा, यातून तुला तुझ्या मनाचा ठाव ठिकाना लागेल, आणी मानसानां तुझ्या अस्तित्वाचा"

हे ऐकून तिला भारावून आलं ती वाट पाहत होती ती उद्याच्या दिवसाची तिला पाहायचं होतं की आजच्या घटनेचा अविनाशवर काय परिणाम पडला आहे.

---------
पुढील भाग   
लवकरच ......