२५ एप्रि, २०११

मनाचिये गुंती ----- बारा



तिच्या आसवानी जे सांगायचं होतं ते सांगितलं. प्रो. मराठेनी ही फार काही विचारल नाही. आणी तिला शेजारी असणारा पाण्याने काठो काठ भरलेला पाण्याचा तांब्या दिला.
" पी हे पाणी पी ...... आणी त्या पाण्याच्या प्रतेक्क घोटा बरोबर  तुझी ही आसवे ही पी म्हणजे मन ही हलके होइल आणी तुझे  डोळे ही."
तिने ते पाणी पिवून. मराठेंकड़े पहिलं; " यात माझा काय दोष आहे मी तर फक्त तिथे सरानी  बोलावलं म्हनुनच गेले होते. मग .."

"हे बग साधना तूझ्या मनात काही नाही मानतो मी पण अविनाशचं काय कदाचित नंदिनी जे काही बोलली त्यात काही तरी सत्य असावं. नाहीतर ही अशी चुक नंदिनी सारख्या बाईकडून होन अशक्य आहे.:" आपली शंका विचारत मराठे बोलले.

"नाही ..." थोडं भांबावून साधना बोलली. "असं  नाही  होऊ  शकत. का असं होतय. सर मला पुन्हा ते सर्व नकोय. मी खुश आहे.... जी काही आहे ती " थोड्याश्या विचलित होवून साधना बोलत होती.



"का ... स्वताला फसवत आहेस. " साधनाच्या डोक्यावर हाथ  ठेवून  मराठे उत्तरले. "वय हे माणसाच्या शरीराला असतं त्याच्या मनाला नसतं मग हे का होऊ शकत नाही. जसं प्रशांत तुला विसरून, त्याच आयुष्या जगण्यासाठी निघून गेला. आणी तू आहेस की अजुन ही गुरफतुन बसली आहेस तुझ्या त्या भूत्कालात"


"सर असं कसं बोलू शकता तुम्ही, तुम्हाला सर्व माहित असून सुद्धा ...."
"काय ...काय माहित आहे मला प्रशांत ला अजुन ही तू तुझ्या आयुष्यातून बाहेर काढू शकली नाहीस की अविनाशला तुझ्या आयुष्यात येवू  देत नाहीस."


"त्यांच लग्न झाले आहे जरी मी त्यांच्या बद्दल असा काही विचार केला देखिल तरी माझ्यासाठी ती माझी फसवणूक असेल. "  
त्रस्त होउन मराठे ओरडले "तू तुझा विचार का करत नाहीयेस. तू अविनाशला आवडतेस. तुम्ही दोघानी एकत्र येणे, दोघांसाठी भल्याचे असणार आहे. तू हा विचार का करत नाहीयेस.: 


साधना स्तब्ध झाली काही वेळ तिला तिच्या स्वार्थासाठी विचार करण्यासाठी मराठेनी एकट सोडलं.


त्या एकट्या क्षणी साधना काय विचार करणार हे मराठेना माहीत होत, तरी देखिल त्यानी तिथून जान सोयीस्कर समजल....


'प्रेम पुन्हा होऊ शकत... नाही मग मनाच काय ते तर अगोदरच कोणाला तरी दिलेलं असतं मग त्याच काय ... नाही हा माझा भ्रम आहे दुसरं काही नाही ,, छे.. अविनाश प्रशांतची जागा घेवुच शकत नाहित. मी पहीली ही प्रशांतची होती आणी आज ही प्रशांत चीच आहे...."
मनामध्ये सुरु असलेले शब्द कल्लोळ तिला निर्णय घेण्यास भाग पाडत होते पण साधना घाबरत होती स्वताच्या मनाला कि समजाला .... कि पुन्हा प्रेमात पडण्याला ,,,,,