३ फेब्रु, २०१०

मनाचिये गुंती --- सहा

"मे आय कमिंग सर ,"
हे शब्द कानावर पडताच अविनाश नी रोक्षानी मागे वळउन  पाहिले.


साधना थोडीशी घाबरलेलीच होती. तिला काही कळत  नव्हते की हे तेच अविनाश आहेत का ज्यानी तिला काल रमाच्या  घरी सोडलं होतं.


"काय झालं आहे तुम्हाला" अविनाशने चमकुन विचारलं " तुम्ही पहिल्या सारख काम करत नाही आहात,
any problem"


"नाही काही नाही सर "


" काही नाही. मग स्वप्न म्हणून आयुष्या कड़े पाहनारया  एका मानसाम्ध्ये एव्हढा आमूलाग्र बदल"


" म्हणजे.. मी काही समजले नाही  "


"अहो " आपल्या  सिंहासना सारख्या त्या खुर्ची वरून उठून अविनाशनी तिच्याकडे पाहिलं


" तुमच्या टेबला वरचा तो flower pot , ज्यातील फुले तुम्ही गेले आठवडाभर बदलली नाहीयेत. तेव्हाच मला वाटल की काही गौड़मंगल आहे, पण या वेळेसचा तुमचा लेख वाचला आणी सर्व काही उलगडल. घरी काही probluem  चालु आहे का ? "


"नाही सर, actuly "
"हे बघा, तुमच्या खाजगी जीवनात काय चालू आहे, हे जानन्याचा मला थोड़ी  ही उत्सुकता नाही, पण तुमच्या या नविन रुपाचा माझ्या साप्ताहिकावर पडलेला परिणाम पाहता हे मला जाणून घ्यावं लागेल ."


साधना आ वासून अविनाशचे हे बोलने ऐकत होती. फक्त एका flower pot मधील कुजलेल्या फुलानवरून अविनाशने अंदाज़ पंचे जो निश्कर्ष  केला तो बरोबरच होता.


" मला माहित नव्हतं सर की तुंम्ही तुमच्या स्टाफ कड़े इतक्या बारकाईने पाहता."


" आहो पाहावच लागत. त्या शिवाय थोडीच bussiness चालवता येतो, तुमचच  पहा. त्या तुमच्या टेबलावर दररोज ठेवलेली ती छान फुलं, जो पर्यंत ती ताज़ी टवटवित्  असतात तो पर्यंत आनंद ओसंडून देतात पण नंतर कोमेजुन गेल्यावर तितकच नैराश्या तोंडावर सोडून जातात."


हे अविनाश चे बोलने साधनाला खटकले. आणि आत्तापर्यंत बंद ठेवलेले तोंड तिने नाइलाजा खातिर उघडले
" आहो ते फूल आहे. आनंद देऊन कोमेजुन जाने हा त्याचा गुणधर्मच.  आता त्या फुलाने दिलेला आनंद चेहरयावर किती ठेवायचा हा  प्रश्न ज्याचा त्याचा नाही का ?"


" हो मान्य करतो मी ही पण तुम्हीच पहा. आयुष्यातिल  एका धक्क्याने तुम्ही त्या फुलाने दिलेल्या  त्या सर्व आनंदावर
वीरजन टाकले हो. त्या पेक्षा आमचे बारे आहे. ही कागदाची इम्पोर्टेड फुलं आम्ही आमच्या टेबलावर सजवतो. जी कधी कोमेजत ही नाहित आणी आनंद ....."
 "तो आनंद ही तेव्ह्डाच उसना असतो " अविनाशचे बोलने मध्येच थांबवून साधना बोलली .
" ज्या फुलांबद्दल तुम्ही सांगत आहात. त्या फुलांचा आनंद माणसाने निर्माण केलेला असतो. त्याला निसर्गाचा सोपस्कार नसतो. आणी ही माझी फुले निसर्गाचं अनमोल देन आहे ज्याला माणसांच्या रुढीचा गंध ही नसतो, जरी ते कोमजले तरी निर्वाल्य बनून पवित्र बनते, दोन दिवसांच्या आयुष्यात ते फूल  स्वताचा गंध, स्वताचं सर्वस्व असणारे त्याचे ते रूप सर्व काही माणसाच्या हाथात देते, पण आपण आपलं सर्वस्व हक्क, कर्त्तव्य, अहंकार आणी स्वर्थिपनात आपलं सर्वस्वं झाकुंच ठेवतो "  


तिचं ते रूप अविनाश साठी नविन होतं, पण जे काही होतं त्याने अविनाश थकक नक्कीच झाला.


"सॉरी ...तुम्हाला राग आला असेल but its  true  "
"पुढच्या अंकात तुमच हे रूप पाहायला मलाच नव्हे तर आपल्या वाचकाना ही नक्कीच आवडेल "
साधनाने आपली अपराध्या सारखी नज़र वर करून निघून तिथून गेली
तिच्या डोक्यात विचारांची घाळमेंळ चालु होती. तिला समजत नव्हतं की हे सर्व तिच्या डोक्यात कसं आलं, आल ते आल वरून ओठान्पर्यंत.
" कदाचित मी माझं आयुष्य,  माझे विचार, माझ अस्तित्व, शोधण्यास आणी ते पटवून सांगण्यास निर्भीड झाले आहे. हे याचच लक्षण असावं  "  असाच काहीसा विचार करत ती तिच्या केबिन मध्ये गेली.


इकडे अविनाशच्या डोक्यात सुद्धा विचारांची घालमेल चालु होती, " ही मुलगी जीने  कधी  माझ्यासमोर तोंड ही उघडलं नव्हतं तिने आज मला मी किती चुकत आहे हे दाखवून देत होती. " काहिश्या धुसुर विचारानी अविनाशच्या डोक्यात गर्दी केली होती. तेव्हडयात शेजारचा फोन कड़ाडला.


"हेल्लो "
" हा बोल नंदिनी, अ.. अ ...अ .. अत्ता काही नेमकं सांगू शकणार नाही. असं  कर तू अगोदर तिथे जा मी नंतर वाटल्यास join 
होइन."



-------------------


       

1 comments:

M. D. Ramteke म्हणाले...

मित्रा,
छान लिहलस, जरा लेख अस्ताविस्त पडल्यासारखा दिसतो. setting मधे काही करता येईल का बघावे.