३१ डिसें, २००९

मनाचिये गुंती ---- एक

                         




"अथांग समुंद्र आणी  त्याच्या   या लाटा कुणाला अभद्र वाटतील तरच नवल हजारो लोकांची शारीरिक तसेच मानसिक घान आपल्या अंतरी विलय करून सतत माणसाला शांततेच प्रतिक तसेच जिवंत पण विस्मयकारक उदाहरण देणारा हा समुद्र दररोज कित्ती वेला रडतो कुणाला ठाउक. याच सागराच्या साक्षीने प्रशांतने मला त्याच्या भावना सांगितल्या होत्या मग अत्ता कुठे गेल्या त्या सर्व" समुद्राच्या विहंग्मायी दृश्याकडे पाहून साधना स्वताची समजूत काढत होती.

"गेले दोन वर्ष्य  घेतलेल्या प्रेमाच्या अनाभाका कुठे गेल्या. प्रेमाला उपमा नहीं खरच कित्ती सत्य विधान आहे हे . मागच्या दोन वर्षीतला तो प्रत्येक क्षण प्रशांतच्या नावावरच होता, सर्वकाही अर्पण करुनसुधा हे अस क घडावं , काय कमी पडलं माझं प्रेम की मी स्वतं:"

डोळ्यातून ओघळ:नारया असवाना पुसत ती मनातल्या मानत श्रवत होती. अत्ता या वेळेला कोणीही असे नव्हते ज्याच्याकडे जाऊंन मन हलकं करता आल असतं कारण मागील दोन वर्षीत साधना एव्हाडी प्रशांतमय झाली होती की तिचा मित्रपरिवार "ना" असा होता. अणि हे तिला आज उमगुन आले. अचानक तिच्या आसवाचा झरा काही थेम्बानी भरून आला. अणि काही क्षणातच अथांग खारट समुद्र तिच्या खारट आसवाने विरून गेला.

किती सौम्य होते ते दिवस जणू पूर्ण पृथ्वी बागड़न्यासाती दोन फूलपाखराना: कमी पडली होती. कसलाही विचार न करता साधना प्रशांतच्या प्रेम सागरात विरून गेली होती. आणि अत्ता झोपेतून जाग आल्यासारखे साधना गडबडून उठली होती, पण तेव्हा ना प्रशांत होता ना त्याचे ते प्रेम स्वताला दोष देत साधना त्या समुद्रठीकानी रडत होती. सुर्याने आपला प्रकाश संपत आला आहे अशी ग्वाही देत मावलतिला जात होता. शांत सागराचे दर्शन करण्यासाठी अलेल्या हजारो लोक आत्मिक आनंद घेउन आपापल्या घरी परतत होते. पण साधनाला जणू अजुन त्या आतिम्क अनंदा पासून अगन्तिक होती. तेव्हाच अचानक तिच्या पर्स मधला तिचा vibration mode वर ठेवलेला मोबाइल वाजला.

"hello "

दुसरया बाजूने बोलणारा व्यक्ति काही काळजिनेच तिच्याशी बोलत होती . त्यामुलेच तिचा आवाज धीर- गंभीर स्वरूपात बदलला, अणि ती उत्तरली

"तिकडेच येत आहे, इथे थोड़ी चौपाटीवर आले होते, निकतेच इथून"

"नाही, नाही तुम्ही जेवण करून घ्या, माझी वाट पाहत बसु नका मी बाहेर जेवण केले आहे, प्रशांतबरोबर" अणि चटकन फोन बंद करून जड़ पावलानी घरी जाण्यासाठी साधना निघाली

कधीही taxi साठी पैसा खर्च न करणारी ही साधना, चौपाटी ते पार्ले taxi ने जाणार हा बदल तिला नाही जाणवला पण साधनाला taxi तुन उतरताना पहाताना प्रोफ़ेसर. मराठेना: नक्कीच जाणवला.





२५ डिसें, २००९

थोडं मनातलं ...... पण मनापासून

                  पहील्या चर्चा सत्रात काय लिहाव, काय लिहायला हव. कळत  नाही. पण तरी देखिल हा अपूर्ण पण परिपूर्ण प्रयत्न. आजच्या या fast जगामधे  कोण कुठे हरवला,  कोण कुठे निघून गेला,  कोण कसा आहे, या गोष्टीना कही अर्थ नहीं. जो हजर तो वजीर या सरच्नेला अनुसरून जो तो अपप्ले तळ राखत असतो. जो हरला तो तो तिथेच डगमगुन गेला. अस मानून तिथून पळ करने हे आपल्या भल्याचे हे जो तो समजत असतो पण का आपल्या  आजुबाजुच्या प्रतेक नाही पण काही लोकांची वस्तुंची आपण 
              विचारपूस  तरी करू शकतोच ना. एवढी तरी माणुसकी आपण इथे दाखवू शकतोच की नाही, २० वर्षी पासून असणारे मित्र अचानक २१ व्या वर्षी एकमेकाना भेटण्यासाठी. वेळ ही काढू शकत नाहीत वेळ माणसाची जागा घेऊ  पाहत आहे अस मनाला चाटून जान काही नवल नाहीये, प्रेमाची हज़ार वचनं घेहून सुद्धा का नज़र विचलित होउन इकडे तिकडे शोधत  असते   कोणी perfect . 
               फक्त  एका भ्रमा पोटी आपण प्रेम करतो, तो भ्रम होता की नाही ते पड़तालून पाहण्यासाठी लग्नासारखा without paper contract करतो. होय without paper contract  फक्त इथे त्या कागदाची जागा एका मंगलसूत्रआने घेतलेली असते. अणि शे दोनशे लोक आशीर्वाद रूपी garranted असतात, नंतर याच्याच मुले: घरात भरती - अहोटी येते हे वेगले सांगायला नको. का कोणी perfect भेटावा या ध्यासापोटी कोणाच्याही गल्यात माळ घल्न्यापर्यंत हताश आपण का होतो. याला जवाबदार कोण अपन स्वतः , आपला समाज, ही वेळ , की स्वताचं भविष्य सावरन्यासाथीं: वर्तामनाशी केलेली तडजोड.... 
                 काहीसं असचं माझ्या या आगामी कथेतून सांगण्याचा केलेला प्रयत्नं ......... 
थोडं मनातलं ...... पण मनापासून .......
   "मनाचिये  गुंती  '' 
माझी पाहिले कथा जी सांगेल प्रेमभंगा पासून प्रेम्रंगापर्यन्ताचा  प्रवास