७ जाने, २०१०

मनाचिये गुंती ---- दोन

 







द्विधा हा शब्द मानुस हज़ारवेला हज़ारजागी वापरत असतो, पण येउन संपतो तो त्याच्या मनास्थितिवर. अश्याच द्विधा मनस्थितीत आज साधना सापडली होती. अश्या वेळेस हमखास मानुस बाकीचे कमी पडतात की काय तो स्वता:वरच संशय घ्यायला सुरुवात करतो, साधनाच्या बाबतीत हे असच घडत होतं. taxi तुन उतरताच, "मी उदास तर दिसत नाहीं ना," "माझे डोळे लाल झाले नाहीत ना""सराना काही समजल तर, मी काय उत्तर देऊ" अशे आणी अशे अनेक प्रशनांचा भडिमार ती स्वत:वर करत होती. आणी यासाठी बिल्डिंगच्या खाली असलेल्या सार्वजनिक नळ:च्या इथे जाउन तिने तिचे तोंड धुतले, थोडीशी ओढनी इकडे तिकडे करून, केसावर हलकासा हाथ फिरउन काहीही झालेले नाही मी रोज सारखी आज ही तीच साधना आहे हे दाखवण्याचा एक निरर्थक प्रयत्न करत होती , कारण नावाप्रमाणेच प्रोफ़ेसर. मराठे हे मुंबई विद्यापिठात मराठी भाषेचे प्राध्यापक होते, साधनाला पाहताच जर त्याना या सर्व गोष्ठी समजल्या नाहीत तरच नवल, नंतरची त्यांची फिलोसोफी ऐकण्याची मनस्थिति आज साधनाची नव्हती. म्हणूनच हे सर्व विकल्प साधनाने करून पाहिले.

थोड़ी कचरतच तिने दरवाज्यावर थाप मारली आणी तिथेच तिचा अपेक्षा भंग झाला, दरवाजा अधिपासुनच उघडा होता, तिला काहीही समजेना अत्ता काय करू सराना कसं सामोरे जाऊ, हा विचार तिच्या मनामधे चालत होता. उमभरठा ओलांडताना तिने तिच्या भिरभिरत्या नजरेतून मराठे सर कुठे बसले आहेत याचा निकष लावला, तेव्हाच एका कोपर्यत्ल्या: दहा वर वर्ष्य जुन्या टेबला जवळ पाठमोरे बसलेले मराठे सर दिसले. आजुबाजुला जिलेटीन पेपर्सची पडलेली घान त्याचबरोबर एक कात्री, अणि खेळन्यातले विमान अश्या गाज्यावाज्यात बसलेले मूर्तिमंत मराठे सर. ... होय मूर्तिमंतच कारण गेले ६ महीने एकच वस्तु पुन्हा पुन्हा अमेरिकेत असलेल्या नातवाला पाठवत होते. पण १५ दिवसातच ते gift पुन्हा return भारतातच येत होते. कदाचित पत्ता चुकीचा असावा, नाहीतर घरामध्ये कोणी नसावं अशी समजूत घालून ते पुन्हा ते gift तयार करण्यास सुरुवात करतात. आज ही हाच प्रयत्न चालू होता.

त्यांची नज़र चुकवून साधना आतमध्ये तिच्या रूम कड़े जाण्यास निघाली दोन पावले चालताच तिच्या कानावर काही शब्द येउन धड़कले, "थांब, काय झालं "

तिने काहीसं बीथरतचं मागे वळउन पहिलं, "अं... काही नाही"

"मग आल्या आल्या सुरु होणारी तुझी ती बडबड नाही, का सारखं हे gift मी पोस्ट करत असतो याच्यावरुन काही वाद नाही" छोटसं स्मित देऊन ते बोलले.

चोराला   चोरी करताना त्याच्या   हाताला पकडावं तशी परिस्थिति साधनाची झाली होती

"तुम्ही तुमच्या कामात मग्न होता म्हणून....."

"ते तर मी दररोज असतो, मग आज नक्की काय झालं"

"अं... मी जरा fresh होउन येते हं. नंतर आपन सविस्तर बोलू."

मराठेंच्या प्रशनाच उत्तर न देता काहीतरी बोलायच म्हणून साधना बोलून गेली. पण प्रो.मराठेना जणू काहीतरी झाल आहे याचा साक्षात्कारच झाला होता.

"प्रशांत बरोबरचा आजचा दिवस कसा गेला काही सांगितलं नाहीस तू मला"  शेजारची कसलीतरी चिट्ठी उचलून ते म्हणाले, आणी काही क्षणातच साधनाला कलुन चुकलं की ती चिट्ठी प्रशांतच्या लग्नाची पत्रिका आहे.

सगळे शब्द तिच्या ओठांवर येउन थबकले होते, पण सर्व काही संगन्याचे धाडस तिच्याकडे नव्हते. ओठाबाहेर पड़न्यासाठी शब्द आतुर झाले होते. पण ते बाहेर पडत नव्हते. अश्यावेलेस प्रामुख्याने माणसाचे ओठ साथ सोडून देतात आणी डोळे बोलके होतात. साधनाच्या बाबतीत ही असेच झाले. तिच्या डोळ्यातून पड़नारया शब्द रूपी आसवानी सर्व काबुली देऊन टाकली होती 
 असच होतं जेव्हा आपण मनाला  कुंपण   घालून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे डोळे ते कुंपण तोडून सर्व काही सांगन्याचा प्रयत्न करतात . जे काही झालं ते सरांन पासून  लपवून ठेवायच होतं पण प्रशांतने  पहिल्यांदाच येउन सर्व काही संगीतालेल दिसत होतं.

परिस्थिति पाहता प्रो . मराठेनी फार काही न बोलता आतमध्ये  जाउन एक ग्लास पानी घेउन आले पण तो पर्यंत साधनाच्या डोळ्यात असंख्य अश्रुनिं गर्दी केली होती. ती स्वताचे डोळे पुसन्याचा प्रयत्न करत होती पण जेव्ह्ड़े अश्रु पुसले जात होते तेव्हड़ेच अश्रु डोळ्यात दाटत होते. डोळ्यांखेरीज तिचे  गाल , मनगट अश्रुंच्या ओघलानी ओले झाले होते. तिची ही अवस्था पाहून प्रो. मराठेना तिची किव आली.त्यानी तिच्या डोक्यावरून अलगत हाथ फिरवला. तिने आशेने मराठें कड़े पहिलं.

" रड... अगदी  मनापासून रड"

सरांच हे अपेक्षापलीकडचं बोलणं ऐकून साधना स्तब्ध झाली 

"जर तू माझ्याकडून सांत्वानाची अपेक्षा करत असशील तर ते मला जमणार नाही जेव्ह्डी बेभान होउन तू प्रेमात पड़लिस तेव्हडिच बेभान रडताना हो पण एकही अश्रु पश्चातापाचा असता कामा नये एव्हडिच  माझी अट " 

" सर यात माझी काय चुकी होती, मी माझ्या परीने जेव्ह्ड जमलं तेव्ह्ड देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला मग हे असं क घडावं ? "  रडत, हुंदके  देत पण एका वेगळ्याच आवेगाने ती बोलली.

" माणसाच  हिथचं चुकत, प्रेम, मन, भावना या सर्व गोष्टीना मानुस   एकाच जगेहून बघतो , पण या प्रतेक गोष्टीला निरखून पहिलं तर समजेल या पूर्ण पने स्वतंत्र आहेत.त्याना स्वतंत्र जागा आहेत."

"म्हणजे ?" साधना उत्तरली 

" म्हणजे .....तूच बघ प्रेम करत रहिलिस. जेव्ह्ड देता आल तेव्ह्ड देत रहिलिस. पण जेव्हा प्रशांत कडून प्रेम घेण्याची वेळ आली तर तू उपेक्षित रहिलिस. कुठेतरी तुझा स्वार्थ जागा झाला असं नाही वाटत तुला"

साधना केविलवान्या नजरेने पाहत होती. अणि मराठे तिला पुन्हा साधनाच अस्तित्व प्रशांत शिवाय वेगळ आहे हे पटवून देत होते 

" आपल्या मनसांकडून  प्रेमाची अपेक्षा केली तर कुठे काय भीगडलं सर"

"नाही... यात काहीही गैर नाही !.  पण जो मानुस तुझ्या  प्रेमावर जगतो त्याच माणसाकडून प्रेमाची अपेक्षा करन कितपत योग्य आहे ते तू मला सांग, गेल्या दोन वर्ष्य:त तुम्ही एकमेकाना हज़ार वेळा I  Love  u  म्हणाला असाल पण त्यामध्ये तुमची मन किती वेळा सहभागी होती हे सांगू शकशील"

साधनाची मान खाली होती, तिच्या डोळ्यातील अश्रुरूपी शब्द बोलके होऊ लागले होते. पण तेव्ह्डाच प्रयत्न ती रडू आवारन्याचा करत होती. नेमकं  हेच प्रो .मराठेनी टिपल.

"कुठे गेली ती साधना जी स्वताच्या अस्तित्वासाठी, स्वताच्या स्वातंत्र्यासाठी, घरातून पलुन आली होती. तेव्हा विचार केला होतास की तुझ काय होइल किंव्हा तुझ्या घरात्ल्यांच काय होइल "

साधनाचा निरागस चेहरा पूर्णपणे सुकून गेला होता पण प्रा. मराठेच्या वक्तव्याने तिच्यातली मेलेली आशा पुन्हा जिवंत होत होती.

" तुझ्या प्रेमात जर काही खोट  नव्हती तर का म्हणून तू रडतेस समज  एका स्वप्नात होतीस तू आणी ते गोड स्वप्न मोडल गेलं. पुन्हा तुझं अस्तित्व शोधण्यासाठी मिलालेली ही संधी समजुन पुढे जा." 

----------------

रात्रीचे आठ वाजले होते. रविवार असल्याने आजुबाजुच्या  प्रतेंक घरा मध्ये  रेलचेल चालू होती. पण इथे जणू अगरबत्तिच्या सुगंधा व्यतिरिक्त कुणाचाही वावर जाणवत नव्हता.

साधना फ्रेश होउन तिच्या रूम मध्ये असनारया खिडकीतुन एकटक पाहत होती तेव्हाच मराठे तिथे आले त्यांच्या हातात प्रशांतच्या लग्नाची पत्रिका होती.

" मला असं वाटतय की तू प्रशांतच्या लग्नाला जावस."
" पण  तिथे त्याच्या घरातले ......"
" मग काय झालं जर प्रशांत पत्रिका देन्याच धाडस करू शकतो तर तू तिथे जाण्याचं धाडस करू शकातेसच ना. बघ सातचं लग्न होतं. तुला rception पर्यंत पोहचावं लागेल "

तिने होकारार्थी मान हलवली .



















 


"