२२ जाने, २०१०

मनाचिये गुंती ------ चार















माहित नव्हतं कुणाची गाडी आहे  ती. 
 पण ओळखिची नक्कीच होती. 
काहीशी घाबरी  घुबरी होउन साधना पाठीमागे सरली
.तेवढ्यात  अलगदच  गाडीच्या खिडकीतुन कोणीतरी डोकावलं. 

" excuse me, Miss. Saadhnaa"


हा आवाज़ ओळ खीचा होताच. यात कणभर ही शंका नव्हती. पण कोण तिने पुढे जाउन थोडं पाहिलं 

नावाने  हाक मारताच ती चमकली, आणी त्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट झालं. ते होते अविनाश मुजुमदार. साधनाचे बॉस. 

"हेल्लो सर "

"hi ... तुम्ही इतक्या रात्री,  अश्यावेळी एकटया "

"अ.... actuly मी एक  wedding   reception  attend करायला गेले होते. तिथेच इतकी रात्र झाली "

" ओके ......ठीक आहे. चला मी तुम्हाला तुमच्या घरी...."

"नाही नाही याची काही गरज नाही मी जाइन एकटी "

" हो तुम्ही जाल हो  पण .... उद्या ऑफिस ला यायला उशीर होणार, त्याच काय . चला मी सोडतो."

" मी आज इथेच जवळच  माझ्या मैत्रिणीच्या घरी राहणार आहे.आणी तिथूनच सकाळी ऑफिस ला ...."
साधनाची नकारात्मक उत्तरे चालूच होती.  

"मग तिथेच सोडतो, चला लवकर नाहीतर आजुबाजुला चालणारी लोक काही तरी गैरसमज करून घेतील?"
साधनाने त्यांच्या या विनोदाला साथ देत थोडं हसून होकार दिल्यासारखं केलं. आणी कार मध्ये जाउन बसली.

ऑफिस मधले अविनाश आणी आज या गाडी मध्ये साधना बरोबर  बसलेले अविनाश किती विसंगत.
ऑफिस मध्ये सदासर्वकाळ ओरडत राहणारे अविनाश आज इतक्या सौम्यरित्या वागत होते की जणू ऑफिस मधले अविनाश हे नव्हेच.

"तुम्ही देशमुखांच्या मुलाच्या  reception ला गेला होता का ?"
साधनाचे लक्ष्य आपल्याकडे खेचत अविनाश म्हणाले.

" हो तुम्हाला कसं माहीत "
" जेव्हा तुम्ही आलात  तेव्हा मी तिथेच होतो, मी पहिलं होतं तुम्हाला. पण तुम्ही लगेच निघालात तिथून "

" हा .. आज माझ्या एका friend चा बर्थडे आहे. म्हणून बारा वाजायच्या आत तिथे पोहचायच होतं, म्हनुनच लवकर निघाले"

खर तर  हे होतं की दोन वर्ष्या मध्ये कधी चुकून सुद्धा तिच्या मैत्रिनिंचे वाढदिवस  कधी लक्ष्यात राहिले नाहित आणी आज सर्व आठवणी मैत्रिणी, त्यांचा तो collage चा घोळका. सर्व काही आठवत होतं.

 प्रशांत बरोबरची तिची वाढती मैत्री पाहून. तिच्या सर्व मित्रानी, मैत्रिनिनी तिला चिडवने   सुरु केले होते.  
अश्याच एका मस्करीतुन जन्माला आलेला वादने त्यांच्या  मैत्रीवर घाव घातला होता. साधानच्या कोणत्याच मित्राला तिचा हा नविन फ्रेंड  प्रशांत तेव्ह आवडत नव्हता का कुणास ठावुक पण जणू ते त्याच्या  मध्ये  असं काही पाहत होते की जे साधना कधीच पाहू शकत नव्हती. कदाचित प्रशांत तिच्याकडून काही वेगळ्या अपेक्षाही करायला लागला  होता. आणी त्या मध्ये तिचे हे फ्रेंडस वाटेतला दगड बनत होते.


 एका अश्याच बर्थडे पार्टी मध्ये साधना बरोबर आलेला प्रशांतने  पिवून केलेला  धिंगाना , साधनाच्या समोर तिच्या फ्रेंडसचा  केलेला अपमान अजुन ही ताज़ा होता. जेव्हा मैत्री आणी तीच हे प्रशांत बरोबरच नाज़ुक नातं यांमधलं एक बंध तोड़न्याची वेळ आली तेव्हा तिने मैत्री तोडली.

" बसं इथेच थांबवा "

" are u sure ?" काहिश्या शाकिंक नज़रेने त्यानी विचारल. कारण एका  माध्यमवर्गीय माणसां  मध्ये  आल्यावर नाक मुरडन्याची त्यांची ही सवय फार जुनी होती.
आणी श्रीमंतीचा फुकटचा आव आननारया  मध्ये  हा स्वभाव आपणहून येतोच. 


" हो ... इथेच "

"ओके ....बाय see u tommrow in office"


" yup bye "
असं बोलून  साधना   पुढे निघून गेली. आणी अविनाश गाडी वळवून त्यांच्या घराच्या रस्त्याला.

तिला अजुन ही विश्वास बसत  नव्हता की तिचे ते सदानकदा ऑफिस मध्ये ओरडत असणारे बॉस होते. 
गड़गंज  श्रीमंत, पैसा घरी पानी भरत होता. त्यांची सौभाग्यकांक्षिणी या
 ना त्या कारणाने पैश्याचा धाक  धाकवन्यासाठी तत्पर असे. असो  सध्या  तरी  साधना  समोर  एक  नाविन  आव्हान होते.  दोन वर्ष्या नंतर आज ती त्यांना  तोंड दाखवणार  होती.       




      
         





1 comments:

अनामित म्हणाले...

khup chhan katha aahe, pudchi post kadhi taknar?