१० डिसें, २०११

माझा ट्रेन प्रवास



आपल्या  आजूबाजूला  अजून  कितीतरी  निरनिराळी  आणि   विविधरंगी   माणसं  जगतात  आणि  राहतात  हे  जाणण्याचे आणि ओळखण्याचे   एकमेव  ठिकाण  म्हणजे  ट्रेनचा  प्रवास आणि स्टेशन होय 

काही  दिवसांपूर्वी  कुर्ला  स्टेशनवर    एक  मुलगा  भेटला  त्याला  पनवेलला  जायचे  होते  . पण  कुठल्या प्ल्याटफोम  वर  योग्यती ट्रेन भेटेल हे त्याला   समजत  नव्हतं,  त्यात  तो  मुंबईत नवीन  असल्याने  indicator  समजण्यास  त्याला  अवघड  जात  होते .  योगायोगाने  मी  हि  त्याबाजूला  जात  होतो . “ मी  हि  तिकडेच  चाललो  आहे  , माझ्याबरोबर  चल ” असे  बोलून  तिथून  आम्ही  दोघेजण  पनवेलला  निघालो.

त्या  अर्ध्यातासाच्या  भेटीमध्ये  मी  काही  वेळ त्या मुलाच्या जागी स्वताला ठेवून   भूतकाळात  गेलो .


 सहा  सात  वर्ष्याआगोदर  जेव्हा  मी  मुंबईमध्ये  आलो  तेव्हा  हा  प्रवास  पूर्णपने  अनोळखी  होता . तस म्हंटल तर ट्रेनचा प्रवास काही माझ स्वप्न वैगैरे नव्हत पण मला  ट्रेनची भीती वाटत होती .ट्रेन  पाहताच  मनात  चलबिचल  व्हायची  पाय  ट्रेनमध्ये  टाकताना  दहावेळा  विचार  करायचो  अजूनही  ट्रेन  स्टेशनमध्ये  जेव्हा  येते  , तेव्हा  एक  भीती  वाटत  असते . या  काही  वर्ष्यामध्ये. या  फोबिया वर  मात  करण्यास तरी मी यशस्वी झालो  . 

स्टेशनवर  गेल्यावर  कोणत्या  दिशेला  मला  जायाचे  आहे . हे  समजण्यासाठी  चार  पाच  जनाना  विचारावे  लागे .  त्यातले  काही  जन   “ indicator समजत  नाही  का ... “, अस  बोलून  पुढे  निघून   जात   तर  काही  जन  नवीन  आहे  हे  समजून  मार्गदर्शन  करी  . कधीकधी इतके  अजब  प्राणी  भेटत  “हो  प्राणीच  बोलेन ” त्यांच्याबद्दल  बोलण्यासाठी  हि  जागा  नक्कीच  योग्य नाही  , अश्यावेळेस  तर  ट्रेन  मधून मनात नसतानाही  पुढच्या  स्टेशनला  उतरणे   योग्य   समजले .

कधी  गच्च  भरलेल्या  ट्रेन  मध्ये  खिसेकापूंची भीती  असल्याने “ट्रेनमध्ये  चढताच  ब्याग   पुढे  घ्यावी ” हा  माझ्या  दादाने  दिलेला  कानमंत्र  मी  अजूनही  नित्यनेमाने  पाळतो .

हार्बर लाईन वर  राहत  असल्याने  वेस्टर्न  लाईन   आणि  सेट्रल  तशी  नवीनच  त्यात  अत्ता  माझ  ऑफिस  वेस्टर्न  लाईनला  असल्याने  त्या लाईनचा   काहीसा  अंदाज  मला  आला  आहे .... आणि सेट्रल लाईन  अजूनही  अनामिकच . 

पण  खरच  ट्रेन  हि  मुंबईची  रक्तवाहिनी  आहे  हे  खरच . एक  दिवसाच्या  मेगा ब्लोक असो वा मोटरमन चे संप , यामुळे होणारे प्रवाश्यांचे  हाल  याचा  सर्वात  मोठा  पुरावा  आहे .  परप्रांतीय   असो  वा  इथलाच  कोणी . मुंबईमध्ये  माणसांनी  जरी  माणसाना स्वतापासून  दूर  ठेवल  असले  तरी  ..या  सर्वाना  जवळ  करून  आपलस  या  ट्रेननीच    केलंय  असं  म्हणन  काही  चुकीच ठरणार  नाहीये ....