२० मार्च, २०१०

मनाचिये गुंती ---- अकरा

"किती हास्यास्पद आहे हे सर्व.  ज्या मुलीबरोबर आयुष्याची सुखी स्वप्न पहीली आणी आज तिच्या आणी माझ्या लग्नाचा वाढदिवस असून सुद्धा मी विसरलो. किती वाईट आहे हे सर्व" 

पार्टी ला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत तो या सर्व गोष्टींचा विचार करत होता. तेव्हड्यात त्याची नजर नंदिनी कड़े गेली.
तिच्या तोंडावर असणारे हसू किती नैसर्गिक आहे आणी किती स्वताहून हासन्याचा व खुश राहण्याचा प्रयत्न आहे त्याचा थांग पत्ता लागत नव्हता.
"नंदिनी खरच माझ्याबरोबर खुश आहे की फक्त खुश राहण्याचा प्रयत्न करत आहे. मला तर कधीच तिच्याबद्दल एक वेगळ असं फील झालं नाही मग हे आहे तर काय ? मंगलसूत्र घातलं म्हणून अयुश्याभर त्या व्यक्ति बरोबर रहायच ज्याच्या बद्दाल थोड ही आकर्षण नसावं."

"सर "  गोंधळवून  अविनाशने आवाजाच्या दिशेने पाहिले. " साधना...!  "  साधनाला पाहताच अविनाशच्या डोळ्यात एक वेगळीच  चमक दिसली . साधनाला ही ती जाणवली.

" अ  अ .. थोड़ा उशीरच झाला सॉरी "

"इट्स ओके ... ये .. सर्व स्टाफ आला आहे . तुझीच कमी होती."

अविनाश साधनाला घेवुन आत गार्डेन मध्ये येतो जिथे ही पार्टी चालली होती. सर्वांच्या भेटी गाठी होत होत्या. साधनाला  पाहून सर्व जन खुश झाले. पण नंदिनी का कुणास ठावुक हे सर्व पाहत असताना खुश नव्हती. जेव्हा अविनाश तिथे साधनाला घेवुन आला तेव्हा नंदिनी  साधनाकड़े टक लावून पाहत होती.

"नंदिनी ही साधना आपल्या साप्ताहिकाची सर्वात लोकप्रिय लेखिका" अविनाशने त्याच्या परीने ओळख करून दिली.

 " हो ..... माहितीये .. hi .. कशी आहेस." थोडसं तुस्ड़ेपणाने नंदिनी बोलली.

" बरी आहे ... तुम्ही कश्या आहात.."

हे सर्व चालू असताना अविनाशचे सर्व लक्ष्य साधनाकड़े होते. तीच सहज बोलन काही दिवसानपूर्वी त्याला आवडत नव्हते पण आज तो प्रतेक्क शब्द जो तिच्या ओठातून बाहेर पडत आहे. तो गोड वाटत होता.



तेव्हड्यात अविनाशच्या काही मित्रानी त्याला हाक मारली आणी तो त्या दिशेने गेला.

" सो ... साधना फार ऐकले तुझ्याबद्दाल तुझ्या कामाबद्दल, तुझ्या बोलन्याब्द्दल आणी हो तुझ्या सौन्दर्याबद्दल ही ...."
काहिश्या भुवया उंचावुन नंदिनी हे सर्व बोलत होती. साधना तशी साजस आणी सधी मुलगी आणी हे तिच्याकडे पाहून लगेचच समजावून येत होतं .

" हो .... थैंक्स अगदीच तसच नाही. जे माझ काम आहे तेच मी करत असते." साधनाने हसतच हे उत्तर दिले.

"ह्म्म्मम्म्म्म ... actuly  तसं तुझ्या बोलण्याचा प्रभाव हा आमच्या यांच्यावर ही जाणवू लागला आहे."
साधनाने लगेचच अविनाशकड़े वळऊन  पाहिले. तर तिला ही ते जानवलं अत्तापर्यंत फक्त स्वताला पैश्याच्या मोजमापात मोजनारे अविनाश जरा वेगलेच दिसत होते.

"साधना...!" जरा स्वर वर करून नंदिनी बोलली .
साधनाने थोडं दच्कुनच पाहिलं

"मला माहित नाही ... पण तू आणी अविनाश नाक्कीच काहीतरी....."

"प्लीज्ज़ काय बोलताय हे ... ते फक्त आमचे बॉस आहेत. त्या पलिकडे ना त्याना माझ्याबद्दल काही माहिती आहे आणी ना मला त्यांच्या बदल"

" ते मला समजत .... मीच नव्हे ऑफिस मधले फार लोक तुम्च्याब्द्दाल बोलत असतात."


" मी  त्यांची  बायको  असून सुद्धा त्याने कधी माझा शब्द पडू दीला नाही आणी तुझ तत्वज्ञान  तर ते फार चवीने ऐकतात. हे बग तुझ्या बद्दाल मला जास्त माहीत नाहिये पण इकडे माझ्या संसारात आडकाठी घालण्याचा प्रयत्न ही करू नकोस "

साधनाचा चेहरा  हे सर्व ऐकताना  रडवेला झाला होता. इथे येताना तिने कधीच हा विचार नव्हता केला की नंदिनी तीच स्वागत असं करेल.

हे सर्व बोलून नंदिनी तर तिथून निघून गेली पण साधनाच्या कानात हे शब्द एखाद्या ज्वलंत आगि सारखे कानात घोलत होते. तिने तिथून कुणालाही न संगता जाने ठीक समजले.

-------------

घरी उशिरा येइन म्हणून सांगुन गेलेली साधना इतक्या लवकर घरी येईल असं प्रो . मराठेना वाटलं नव्हत.
तिचा चेहरा पाहून त्यानी तर्क लावण्याचा प्रयत्न केला. पण सर्व काही फोल ठरलं.

"काय झालं काही प्रॉब्लम ..." 
पण साधना काहीही न बोलता घरात आली अणि खुर्चीवर बसून ढसा ढसा रडू लागली


   

   

४ मार्च, २०१०

मनाचिये गुंती ---- दहा

"स्वप्नातल्या जगात जगत होतो. ऐश आराम सर्व काही पायाखाली. तरी देखिल नीरस आणी बेचव आयुष्य जगत होतो मी, या झोपेतून उठवले ते त्या साधनाने "  घरात शांत बसून अंधार करून अविनाश हे सर्व मनातल्या मनात बोलत होता.

" का? . काय चुकीचं बोललो मी जर असच आहे तर तुम्ही सांगा काय बोलतात ही फुलं, काय सांगतात ही फुलं ? 
जे तुम्ही एव्हड खुश होता."

या  अविनाशच्या  प्रश्नाला साधनाने दिलेलं उत्तर खरच त्याच्या मनाला  भिडलं होतं. ते  उत्तर अविनाशसाठीच नव्हे तर पूर्ण मनुष्य जातीला प्रेरणा देणारी नक्कीच होती.

साधना म्हणाली होती 
" माझ्यासाठी ही फुलं म्हणजे   फक्त   ती सुगंध देणारी किव्हा छान रंग आपल्या अंगावर ओढावून  घेतलेली फक्त एक शो म्हणून वापरावीत असे नव्हे. एक फूल म्हणजे पावसाच्या एका थेंब आणी त्याचे अस्तित्व किती विस्मयकारक आहे हे संगनारा एक दूत ..फूल म्हणजे मातीचा हुंकार, पावसाच्या प्रतेक्क थेम्बाला दिलेला प्रतिसाद म्हनुनच तर एक फूल फक्त एकदाच जन्माला येते. "  

अविनाश हे सर्व ऐकत होता. आणी ही मुलगी आपल्याला जे काही सांगत आहे ते पट्न्यासारखे तर नव्हतच पण हे शब्द मोत्यासारखे साधनाच्या तोंडातून पड़त होते हेच सुखकारक  होते.

"माझ्यामते जामिन आणी आकाश  यांचा मिलाप झाला आहे हे  दूर दूर वर पोहच्वनारा वारा  जेव्हा फुलाच्या कानात जावून हा निरोप देतो तेव्हा आणी तेव्हाच फुलाच खळखळवून हसने म्हणजे निसर्गाचा एक अनोखा चमत्कारच नाही का. दोन दिवसाच्या त्याच्या आयुष्यात तो किती सुखं अनुभवतो अणि किती सुखं हाथोहाथ उधळतो हे खरच वाख्न्याजोगे आहे. एव्हडं सगळ मला एका फुलात दिसते."

तिची ही वैचारिक दृष्टी पाहून अविनाश थोड़े भारावलेच त्याना का कुणास ठावुक पण ते साधनाच्या त्या नविन रुपात फारच खोलवर गुंतत चालले होते पण त्याचा पथ पुरावा ते करत नव्हते.

"छान साधना ...! खरच अतिशय छान कल्पना आहे तुझी पण आपल्या या धका धकीच्या आयुष्यात या सर्व विचाराना काय महत्त्व कारण माझच पहा रोज़ सकाळी जीम, त्य्नंतर ऑफिस then घर तिथे माझी बायको असते एका नवरयाला एका बायको कडून ज्या अपेक्षा असतात त्या सर्व अपेक्षा ती पूर्ण करत आहेच. मग का म्हणून या पहजिल गोष्टीमध्ये मी अडकून पडू यान साठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहिये."

साधना हसली आणी बोलली 

" याचं उत्तर तुम्हाला फुलाच्या सुगंधात भेटेल .. फुलाचा सुगंध म्हणजे आकाशतत्व कारण त्याला अंतर नाहिये म्हनुनच सुगंधाचा प्रारंभ आणी शेवट शोधता येत नाही म्हनुनच वार्याचा एक झोका त्याला जिथपर्यंत नेयिल तिथपर्यंत त्याचे आकाश . आपल्या मानसांचं ही असच असतं सर जिथपर्यंत आपण सुख उपभोगु शकतो तिथपर्यंतच  आपण सुखी असतो पण  सुखाचा  थोडासा जास्त ढोस भेटला तर तोही आपल्याला नकोसा वाटतो. आपल्या कड़े सर्व काही असून सुद्धा फार काही नसतं पण त्याचा विचार न करता आपण आपले आयुष्या जगत असतो. पण जेव्हा कळत  की  अरे हे तर मला नको होतं तेव्हा खरया सुखाचा वेध आणी शोध चालू होतो."

काहीसे गडबडून अविनाश म्हणाले नाही नाही मी खुश आहे. सध्या तरी माझी बायको आणी मी दोघे ही आनंदी आयुष्या जगत आहोत " 

"जेव्ह्दं मी तुमच्या बायकोला ओळखते. त्यावरून ऐव्हाड्च म्हणेन की  तुम्ही दोघे खुश आहात कारण तुमची लाइफस्टाइल एकच आहे. ना तुमच्या काही अपेक्षा आहेत आणी ना तुमच्या बायकोच्या तुमच्याकडून. आणी जर अपेक्षाच नसतील तर पूर्णत्व येणार कुठून.
तुम्हाला कदाचित राग येईल माझ्या या बोलण्याचा पण मला संगाव्सं वाटत आहे ज्या गोष्ठीवर प्रेम करण्यात काही रिस्क नाही . त्या गोष्ठीवर  प्रेम करणारी मानसं खुप असतात. पण खरतर ते प्रेम नसतं ती मालकी असते. कारण ते प्रेम सुरक्षित असतं तिथे समर्पण नसतं. आणी समर्पनाशिवाय प्रेम .....हं .. its too difficult   "

तिचे शब्द अजूनही अविनाशच्या कानाशी घुरळ  घालून बसले होते. तेव्हड्यात त्याच्या कानावर काही अनपेक्षित आवाज़ येवून धडकला आणी तो होता. नंदिनिचा.

"अरे अवि इतक्या लवकर  ऑफिस मधून कसा काय आलास " बोलतच तिने तिच्या हाथाना रुंदावून अविनाशला मीठी मारण्याचा प्रयत्न केला. पण अविनाशने त्याचा मुड नाहिये असं दाखवत बाजुला सरला.
 आणी नंदिनी तिथून निघून गेली.

अविनाशने पाठमोर्या  नंदिनिकड़े पाहिलं आणी पुन्हा विचारात गुंतला 

"अरे हे काय नंदिनिने काय झालं हे विचारलं सुद्धा नाही. दररोज दिली जाणारी मीठी आज अश्याप्रकारे 
झिडकारन्याचे कारण ही तिने विचारले नाही. याचा अर्थ काय मला जे हवं आहे ते द्यायचं काम ती दररोज करते पण  मनाचं काय त्याला काय हवं अहे  ते  कसं कळनार तिला खरच साधना बरोबर बोलली हे ते प्रेम नव्हे जे मला हवे आहे. मग  ते आहे तरी कुठे  कसं शोधू मी त्याला " 

तेव्हड्यात नंदिनी तिथे फ्रेश होंउन आली. तिला काही बोलायचे होते पण  ती अड़खळत होती 
अविनाशने  ते ओळखले आणी तिला बोलला 
" काय झालं काही बोलायचे आहे का? "
"हो कदाचित तुम्हाला अथ्वानित नसेल पण सांगन भाग आहे."
अविनाशला काहीही कळत नव्हते " काय झाले आहे "
उद्या आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. आणी दरवर्षीप्रमाने तुम्ही या वर्षी ही विसरलात असो  विचार करत होते  की उद्या  घरी एक पार्टी organise  करावी पहा जमलं तर लवकर या " एव्हडं बोलून नंदिनी तिथून निघनारच होती पण ..

" हे नंदू सॉरी .... खरच आपल्या आयुष्यातला अव्हादा मोठा क्षण आणी मी .... सॉरी या पुढे असं होणार नाही. उद्या लवकर येइन आणी माझ्या काही friends ना सुद्धा invite  करें ओके .."

नंदिनी हसतच पुढे आली. आणी अविनाशला तिने मीठी मारली. 

...............................

पुढील भाग 
लवकरच ....