१५ जाने, २०१०

मनाचिये गुंती --- तीन





लखलखत्या, चमकदार मुंबईच खरं आणी साधं रूप पहायचं असेल ना. तर रवीवारी रात्री दहाच्या नंतर बाहेर निघावं. गेली सहा दिवस गर्दीतून घुसमटत श्वास घेणारे इथले रस्ते आज रात्री खर्या  अर्थाने श्वास घेत असतात . असाच कसला  तरी  विचार शिवाजी पार्कच्या रस्त्याने चालताना साधना करत होती. गेल्या दोन वर्ष्यात तिने तिचे हरवलेले अस्तित्व. आज शोधायला सुरुवात केली होती जणू .
आज रविवार असून सुद्धा तिने आज  त्याला मनापासून अनुभवला नव्हता आजचाच काय गेली कित्तेक रविवार फक्त प्रशांतच्याच नावावर होते. आणी आज पासून फक्त मी आणी फक्त मीच असे काहीसे धुसुर पण निराग्रही विचार साधना करत होती.




मध्येच एकटी वेड्यासारखी हसत होती तर स्वता भोवती एक गिरकी मारून दोन हाथ डोळ्यावर ठेवून लाजत होती. जणू आज तिच्या अपेक्षाना पंख फुठले  होते, आणी या अपेक्षा दुसरया कोणावर अवलंबून नव्हत्या त्या तिच्या हक्काच्या होत्या.
ती आज जिंकली होती.  स्वतावरच संशय घेउन आपण फक्त आपलाच आत्मविश्वास हरवून बसतो. प्रशांत तिच्या प्रेमाच्या वर्षावात  चिंब भिजला पण त्याला तो वर्षाव सहन झाला नाही.
 तो वर्षाव त्याच्यासाठी नव्हताच मुळी. आणी हेच तिला उमगल होतं जणू. मराठेंच्या आग्रहास्तव ती reception  ला  गेली. पण तिथे गेल्यावर तिला कोणत्या प्रकारची वागणूक मिळेल हे तिला माहीत नव्हतं. पण तरीही ती तिथे गेली होती,
कसल्याही प्रकारचा जाब तिला विचारायचा नव्हता. त्याला फक्त सांगायच होतं की 
" thanks , दाखवून दिल्याबद्दल की तूझी प्रेम करण्याची लायकीच नाहीये".
हे  ती बोलणार की नाही हे माहीत नव्हतं पण हो आवेग तर तोचं होता. तिथे गेल्या गेल्या साधनाला  प्रशांतच्या बापाचा पैसा, त्याचं नाव, त्याची ख्याति जाणवली. आणी ती त्या मंडपात दिसली सुद्धा.




प्रशांतचा बापाने साधनाकडे हसून पाहिलं
"फार उशीर केलास यायला, प्रशांत कधीपासून तुझी वाट पाहत होता माहितीये"  

"हो ....थोडं काम होतं मला तेच करून आले, काका ...अ...अ प्रशांत ...."

"तो काय तिथे पहुन्यानशी बोलतोय"    

असं बोलून ते निघून गेले. पण प्रशांतची आई जणू साधनाशी  लपाछपी खेळत होती तिने साधनाला तोंडं ही दाखवलं नाही.
प्रशांतचे भाऊ,बहिनिणी तर कधी साधनाला आपलसं केलच नव्हतं.  त्यामुले   त्यांच्या कापलावरच्या  आठया काही
 नविन नव्हत्या. ती पुढे होउन प्रशांतला भेटन्यास  निघाली. तो अगोदरच काही पहुन्यान मध्ये busy होता. तरीदेखिल साधना पुढे होउन गेली.


" hi "


त्याने आगंतिक नज़रेने तिच्याकडे पहिलं
" hi , तू ....."


' हो ... मी का  अजुन कोणी येणार होतं का?'


"नाही म्हणजे ..... तुझी ओळख करून देतो, ही  माझी बायको नम्रता"


साधना थोड़ी हसली . एक जबरदस्तीचं स्मित देऊन ती म्हणाली
" hi "


तेवढ्यात नम्रता प्रशांतला उदेशुन म्हणाली
" हिची ओळख नाही करून देणार का ? "  


" हो... हो.. का नाही नक्की , ही माझी.." थोडसं अड़खलतच त्याने उत्तर दिले '' माझी... मैत्रिण साधना "


साधनाकडे एक नज़र टाकुन त्याने उत्तर दिले. पण ती नज़र किहिशी झुकलेलीच होती.
हा तोच प्रशांत होता ज्याने मान वर करून एक दुर्मिल नजर टाकुन " माझं तुझ्यावर प्रेम आहे " असं बोलला होता. आणी आज तीच नज़र इतकी खाली. 
आणलेला फुलांचा गुछं  प्रशांतच्या हाथात देऊन साधना तिथून निघाली.





त्या अंधार्या रात्रीत जरी ती एकटी चालली होती तरी तिच्या सोबत होत्या त्या  आठवणीं त्या आठवणी ज्या कधी तिच्या आयुष्यात प्रेमाची घुलुक घेउन आल्या होत्या.

सबंध महाविद्यालय साधनाच्या नावाचा उदोउदो करत होता. जिकडे पहावं तिकडे फक्त साधना होती. जूनियर पासून सेनिअर च्या  तोंडात  फक्त  साधनाचेच  नाव होते. कारण अंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत साधनाने त्यांच्या महाविद्यालयाला उच्च स्थानावर पोहचवले होते. विषय होता " मुली आणी भारतीय संस्कृति" हां विषय साधनाचा फार जवलचा होता. तिच्यावर शुभेछाचा पाउस पडत होता आणी त्यातूनच एक अभिनंदनाचा हाथ प्रशांतचा होता.
पण नंतर collage च्या बाहेर फाटकाजवळ आड़वून त्याने मला विचारलं
" अभिनंदन "


" अ....thanks  पण मी ओळखलं  नाही तुम्हाला "


" हो ....कसं ओळखनार , आपण कधी भेटलोच नाही. तसा मी तुमचा सेनिअर आहे "


" ओह ...ok "


त्याची नजर सैरभैर झाली होती. विचरायच काही वेगळ होतं आणी तो काही तरी  वेगळ बोलत होता.

"मला थोड़ा उशीरच झाला आहे. मला जावं लागेल"  साधना उत्तरली 


" ok  चालेल मी तुम्हाला सोडू का?"


" अं " काहीशी प्रश्नाकिन्त  नज़रेने साधनाने उत्तर दिले " नाही नको ..... म्हणजे तुम्हाला कशाला त्रास"


" छे... हो त्यात कसला आलाय त्रास, जर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडलं की तेव्हडाच तुम्हाला समजुन घेण्यासाठी मला मला वेळ मिळेल,  आणी ओळख ही वाढेल. नाही का ?"  


त्याचे हे सहज बोलने साधनाला थोडेही खटकले नाही. कारण अशी सहज बोलणारी माणसं तिला आवडत  असत.


"हो नक्की पण आत्ता नको, पुन्हा कधीतरी"


जास्त प्रश्न न  विचारता प्रशंतने ही होकार दिला.
" हो चालेल पण एका अटीवर.  उद्या  तुम्हाला माझ्याबरोबर चहा-पाण्याला यावं लागेल."


तिने हसतं मान हलवली. 







त्या रात्री रस्त्याने चालताना साधना जुन्या आठवणी ताज्या करत होती जणू त्या आठवणी आठवून त्या भुतकालातुन पूर्ण पने पुसून टाकायच्या होत्या. पण तिला हे माहीत नव्हतं की भूतकाळ कधीच माणसाचा पीछा सोडत नाही. तो पाठलाग करतच  राहतो. जो पर्यंत तू त्यातून काही शिकत नाहीस तो पर्यंत. असच काहीसं आज रात्री तिच्या बरोबर घडणार होतं.







रात्रीचे ११.०० वाजले होते. रस्त्यावरच्या वाहनांची वरदळ कमी होती. तेव्हाचं तिच्या शेजारी एक मोठी कार येउन थांबली. तिला ही कार कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती. पण कुठे. ते उमगत नव्हते.  कोण आहे आतमध्ये ?
  का थांबली ही गाडी तिच्यासमोर ? 
 काही कळत नव्हते.

----------