२९ जाने, २०१०

मनाचिये गुंती ---- पाच

आज सोमवार कालचा पूर्ण दिवस ज्या पध्हतिने  गेला.त्याला पाहता आजच्या दिवसाला एक महत्व आल होतं. ते म्हणजे साधना च्या  आयुष्याला एक नवी कलाटणी भेटली होती. जवळ जवळ अर्धा दिवस रडत बसल्यावर प्रा. मराठे यांच्या श्ब्दानी एक नवी झलाळी आली होती. आपल्या डोळ्यातून पडणारे आश्रू जर आपल्यासाठीच असतील तर ठीक पण जर ते कोना दुसर्याच्या नावाने ओघळत असतील तर तुमच्या अस्तित्वाला धोका आहे, हे म्हनं वावग ठरणार नाही.

" मी त्याची लग्नाची बायको होऊ शकत नाही का ?"
या साधनाच्या प्रश्नाला मराठेनी हसत उत्तर दिलं की

" प्रीयकर परिपूर्ण असतो, आणी पतीला मर्यादा असतात, तो मनात असून सुद्धा प्रियकरा  इतका  परिपूर्ण होऊ शकत नाही. प्रशांत तुझा प्रियकर होता कारण तिथे समाजाच्या मर्यादा नव्हत्या, पण जेव्हा पति म्हणून त्याच्या व् त्याच्या घराच्या अपेक्षा पुढे आल्या तिथे तू कुठेच नव्हतिस."

 हे शब्द तिच्या कानात ज्वलंत आगि सारखे ओकत होते. पण नात तेच असतं जे सैरभैर मना पासून स्वीकारलं जात, आणी  तितक्याच आवेगाने  ओसंडून वाहिलं जातं . हे सर्व तिने केलं होतं त्यामुलेच की काय तिने स्वताला प्रशांतच्या लग्नाच्या reception ला जाताना रोखू शकलं नाही.

  थोडीशी पालंगावरून  उठून  चादर बाजुला करून तिने खिडकीकडे रोख केला.
जेव्हा मुंबई मध्ये साधना नविन होती. तेव्हा याच घराने तिला आसरा दिला होता.जवळ जवळ तीन वर्ष्य ती या रूम मध्ये तिची मैत्रिण रमा हिच्या बरोबर राहत होती. हीच होती ती जीने या मायानगरी मध्ये आपल्या लोकानी हाथ काढून घेतल्या नंतर  आसरा दिला  होता. काल रात्री आल्या आल्या सागळयानि तीच स्वागत केलं. असं दाखवलं की काही झालाच नव्हतं. सर्वानी तिला मीठी मारली.काही नविन चेहरे होते तर काही जुनेच
इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा सुरु झाल्या. रमाचा वाढदिवस होता, सर्वात जास्त तिला साधनाने heart  केलं होतं. तिला भेटून माफ़ी मागायची होती पण ही वेळ त्या वेड़ीने येऊ दिली नाही. भेटल्या  भेटल्या दोघिही रडायला लागल्या.नंतर  अगदी रात्री बारा वाजता  वाढदिवस साजरा करण्यात आला.  नंतर काय सर्व जन थकल्यामुले  आणी सकाळी लवकर आपापल्या कामाला जायचं म्हणून झोपी गेले. रमाचं घर एवढ मोठं होतच की  तिथे दहा बारा जन आरामात राहू शकतील.




साधना उठे पर्यंत सर्व जन निघून गेले होते. घरामध्ये होते ते साधना आणी रमा.


" चल चल .....लवकर उशीर होतोय ग. " काहीशी धडपड करत, रमा coffe  चा मग हाथात घेउन तिथे  आली "

" सॉरी " साधना काहीशी भुजतच बोलली.

" काय बोलतीयेस तू."

"तुला सर्व काही समजलय ..........येड पांगरुन पेड़ गांवला जाऊ नकोस."

"ह........ या सर्व गोष्टीना आत्ता काय अर्थ आहे का ? "

" हो का नाही ...."थोडीशी गडबडून साधना उत्तरली " कित्ती मोठी गोष्ट होती ती. तुम्हा सर्वाना नाही नाही ते बोलले होते. तुम्ही मला अशे कशे माफी देऊ  शकता "


"साधना... माणूस म्हणून  जगणं आणी माणसा  सारखं जगण याच्या मध्ये फार मोठी तफावत असते."
काहीही ण कळल्यागत साधना ने पाहिलं

"अगं.. तेव्हा तू जी काही वागलीस आणी आत्ताची साधना जी काही वगतियेस हे सर्वपरी तुझ्या मनावर आहे. तेव्हाच बोलन हे तुझ्या प्रेमाची ग्वाही देत होतं. आणी आत्ताच बोलण ही सुद्धा तुझ्या प्रेमाची ग्वाही देनारच आहे फरक एवढाच आहे की प्रेमाची दिशा बदलली आहे."
 साधनाच्या गालावर एक हाथ फिरवून रमा काही काळजीनिशि बोलली .



------------


सकाळचे साडे अकरा वाजले होते. पहिल्यांदाच साधना इतक्या उशिरा ऑफिस मध्ये आली होती. काहीशी घाबरी होउन तिने आपल्या केबिन कड़े मोर्चा वळवला. मुंबईत येतानाच तिने ठरवलं होतं की लेखिका व्हायचं. MA केल्यावर तिने काही मसिकान मधून लेख लिहायला सुरुवात केली  होती. त्यानंतर अविनाश मुजुमदार यांच्या सप्ताहिकासाठी लेख लिह्न्यास बोलावण्यात आलं. एक नैसर्गिक गोष्टीचा माणसाच्या मनाशी असणार नात ती तिज्या लेखातून समजुन देत असतं . या आठवड्यातला अंक घरा घरात पोहचला होता. पण साधनाच्या लेखनाने या वेळेस काही किमया केली नव्हती .


तेवढ्यात स्वताहून अविनाश तिथे आले.  आणी त्या आठवड्याचा त्यांचा साप्ताहिक तिच्या टेबल वर फेकलं. आणी रागा रागाने ओरडले 


" मिस. साधना"
थोडीशी घाबरून साधना तिच्या खुर्ची वरुण उठली.


"मी तुमच्याशी बोलतोय, काय आहे हे, तुम्हाला चांगलच माहीत आहे की आपले वाचक तुमच्याकडून फक्त निखळ मनोरंजनाची अपेक्षा करतात. आणी तुम्ही आहात की हा असा वैचारिक विषय घेउन बसलात."
सर्व स्टाफ या दोघांकडे पाहत होता. आणी हे आविनाशच्या लक्षात आल होतं. त्वरित शांत होउन, त्यानी साधनाला त्याच्या क्याबिन मध्ये येण्यास सांगितले.


गेल्या काही दिवसात साधनाची परिस्थिति पाहता ती फारच निराश झाली होती.
पानझड़ीला आलेल्या वटवृक्षा पासून आपन कधी थंड साऊलीची  आशा करतो का. मग साधना तर माणूस आहे ती तिचा गुणधर्म कसा सोडणार. या सर्व परिस्थितिमध्ये  प्रेमाचे दोन शब्द बोलने सुद्धा तिच्यासाठी अवघड होवून बसले होते, मग लिहनं तर लांबची गोष्ट आहे.