आज सोमवार कालचा पूर्ण दिवस ज्या पध्हतिने गेला.त्याला पाहता आजच्या दिवसाला एक महत्व आल होतं. ते म्हणजे साधना च्या आयुष्याला एक नवी कलाटणी भेटली होती. जवळ जवळ अर्धा दिवस रडत बसल्यावर प्रा. मराठे यांच्या श्ब्दानी एक नवी झलाळी आली होती. आपल्या डोळ्यातून पडणारे आश्रू जर आपल्यासाठीच असतील तर ठीक पण जर ते कोना दुसर्याच्या नावाने ओघळत असतील तर तुमच्या अस्तित्वाला धोका आहे, हे म्हनं वावग ठरणार नाही.
" मी त्याची लग्नाची बायको होऊ शकत नाही का ?"
या साधनाच्या प्रश्नाला मराठेनी हसत उत्तर दिलं की
" प्रीयकर परिपूर्ण असतो, आणी पतीला मर्यादा असतात, तो मनात असून सुद्धा प्रियकरा इतका परिपूर्ण होऊ शकत नाही. प्रशांत तुझा प्रियकर होता कारण तिथे समाजाच्या मर्यादा नव्हत्या, पण जेव्हा पति म्हणून त्याच्या व् त्याच्या घराच्या अपेक्षा पुढे आल्या तिथे तू कुठेच नव्हतिस."
हे शब्द तिच्या कानात ज्वलंत आगि सारखे ओकत होते. पण नात तेच असतं जे सैरभैर मना पासून स्वीकारलं जात, आणी तितक्याच आवेगाने ओसंडून वाहिलं जातं . हे सर्व तिने केलं होतं त्यामुलेच की काय तिने स्वताला प्रशांतच्या लग्नाच्या reception ला जाताना रोखू शकलं नाही.
थोडीशी पालंगावरून उठून चादर बाजुला करून तिने खिडकीकडे रोख केला.
जेव्हा मुंबई मध्ये साधना नविन होती. तेव्हा याच घराने तिला आसरा दिला होता.जवळ जवळ तीन वर्ष्य ती या रूम मध्ये तिची मैत्रिण रमा हिच्या बरोबर राहत होती. हीच होती ती जीने या मायानगरी मध्ये आपल्या लोकानी हाथ काढून घेतल्या नंतर आसरा दिला होता. काल रात्री आल्या आल्या सागळयानि तीच स्वागत केलं. असं दाखवलं की काही झालाच नव्हतं. सर्वानी तिला मीठी मारली.काही नविन चेहरे होते तर काही जुनेच
इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा सुरु झाल्या. रमाचा वाढदिवस होता, सर्वात जास्त तिला साधनाने heart केलं होतं. तिला भेटून माफ़ी मागायची होती पण ही वेळ त्या वेड़ीने येऊ दिली नाही. भेटल्या भेटल्या दोघिही रडायला लागल्या.नंतर अगदी रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करण्यात आला. नंतर काय सर्व जन थकल्यामुले आणी सकाळी लवकर आपापल्या कामाला जायचं म्हणून झोपी गेले. रमाचं घर एवढ मोठं होतच की तिथे दहा बारा जन आरामात राहू शकतील.
साधना उठे पर्यंत सर्व जन निघून गेले होते. घरामध्ये होते ते साधना आणी रमा.
" चल चल .....लवकर उशीर होतोय ग. " काहीशी धडपड करत, रमा coffe चा मग हाथात घेउन तिथे आली "
" सॉरी " साधना काहीशी भुजतच बोलली.
" काय बोलतीयेस तू."
"तुला सर्व काही समजलय ..........येड पांगरुन पेड़ गांवला जाऊ नकोस."
"ह........ या सर्व गोष्टीना आत्ता काय अर्थ आहे का ? "
" हो का नाही ...."थोडीशी गडबडून साधना उत्तरली " कित्ती मोठी गोष्ट होती ती. तुम्हा सर्वाना नाही नाही ते बोलले होते. तुम्ही मला अशे कशे माफी देऊ शकता "
"साधना... माणूस म्हणून जगणं आणी माणसा सारखं जगण याच्या मध्ये फार मोठी तफावत असते."
काहीही ण कळल्यागत साधना ने पाहिलं
"अगं.. तेव्हा तू जी काही वागलीस आणी आत्ताची साधना जी काही वगतियेस हे सर्वपरी तुझ्या मनावर आहे. तेव्हाच बोलन हे तुझ्या प्रेमाची ग्वाही देत होतं. आणी आत्ताच बोलण ही सुद्धा तुझ्या प्रेमाची ग्वाही देनारच आहे फरक एवढाच आहे की प्रेमाची दिशा बदलली आहे."
साधनाच्या गालावर एक हाथ फिरवून रमा काही काळजीनिशि बोलली .
------------
सकाळचे साडे अकरा वाजले होते. पहिल्यांदाच साधना इतक्या उशिरा ऑफिस मध्ये आली होती. काहीशी घाबरी होउन तिने आपल्या केबिन कड़े मोर्चा वळवला. मुंबईत येतानाच तिने ठरवलं होतं की लेखिका व्हायचं. MA केल्यावर तिने काही मसिकान मधून लेख लिहायला सुरुवात केली होती. त्यानंतर अविनाश मुजुमदार यांच्या सप्ताहिकासाठी लेख लिह्न्यास बोलावण्यात आलं. एक नैसर्गिक गोष्टीचा माणसाच्या मनाशी असणार नात ती तिज्या लेखातून समजुन देत असतं . या आठवड्यातला अंक घरा घरात पोहचला होता. पण साधनाच्या लेखनाने या वेळेस काही किमया केली नव्हती .
तेवढ्यात स्वताहून अविनाश तिथे आले. आणी त्या आठवड्याचा त्यांचा साप्ताहिक तिच्या टेबल वर फेकलं. आणी रागा रागाने ओरडले
" मिस. साधना"
थोडीशी घाबरून साधना तिच्या खुर्ची वरुण उठली.
"मी तुमच्याशी बोलतोय, काय आहे हे, तुम्हाला चांगलच माहीत आहे की आपले वाचक तुमच्याकडून फक्त निखळ मनोरंजनाची अपेक्षा करतात. आणी तुम्ही आहात की हा असा वैचारिक विषय घेउन बसलात."
सर्व स्टाफ या दोघांकडे पाहत होता. आणी हे आविनाशच्या लक्षात आल होतं. त्वरित शांत होउन, त्यानी साधनाला त्याच्या क्याबिन मध्ये येण्यास सांगितले.
गेल्या काही दिवसात साधनाची परिस्थिति पाहता ती फारच निराश झाली होती.
पानझड़ीला आलेल्या वटवृक्षा पासून आपन कधी थंड साऊलीची आशा करतो का. मग साधना तर माणूस आहे ती तिचा गुणधर्म कसा सोडणार. या सर्व परिस्थितिमध्ये प्रेमाचे दोन शब्द बोलने सुद्धा तिच्यासाठी अवघड होवून बसले होते, मग लिहनं तर लांबची गोष्ट आहे.
२९ जाने, २०१०
२२ जाने, २०१०
मनाचिये गुंती ------ चार
काहीशी घाबरी घुबरी होउन साधना पाठीमागे सरली
.तेवढ्यात अलगदच गाडीच्या खिडकीतुन कोणीतरी डोकावलं.
" excuse me, Miss. Saadhnaa"
हा आवाज़ ओळ खीचा होताच. यात कणभर ही शंका नव्हती. पण कोण तिने पुढे जाउन थोडं पाहिलं
नावाने हाक मारताच ती चमकली, आणी त्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट झालं. ते होते अविनाश मुजुमदार. साधनाचे बॉस.
"हेल्लो सर "
"hi ... तुम्ही इतक्या रात्री, अश्यावेळी एकटया "
"अ.... actuly मी एक wedding reception attend करायला गेले होते. तिथेच इतकी रात्र झाली "
" ओके ......ठीक आहे. चला मी तुम्हाला तुमच्या घरी...."
"नाही नाही याची काही गरज नाही मी जाइन एकटी "
" हो तुम्ही जाल हो पण .... उद्या ऑफिस ला यायला उशीर होणार, त्याच काय . चला मी सोडतो."
" मी आज इथेच जवळच माझ्या मैत्रिणीच्या घरी राहणार आहे.आणी तिथूनच सकाळी ऑफिस ला ...."
साधनाची नकारात्मक उत्तरे चालूच होती.
"मग तिथेच सोडतो, चला लवकर नाहीतर आजुबाजुला चालणारी लोक काही तरी गैरसमज करून घेतील?"
साधनाने त्यांच्या या विनोदाला साथ देत थोडं हसून होकार दिल्यासारखं केलं. आणी कार मध्ये जाउन बसली.
ऑफिस मधले अविनाश आणी आज या गाडी मध्ये साधना बरोबर बसलेले अविनाश किती विसंगत.
ऑफिस मध्ये सदासर्वकाळ ओरडत राहणारे अविनाश आज इतक्या सौम्यरित्या वागत होते की जणू ऑफिस मधले अविनाश हे नव्हेच.
"तुम्ही देशमुखांच्या मुलाच्या reception ला गेला होता का ?"
साधनाचे लक्ष्य आपल्याकडे खेचत अविनाश म्हणाले.
" हो तुम्हाला कसं माहीत "
" जेव्हा तुम्ही आलात तेव्हा मी तिथेच होतो, मी पहिलं होतं तुम्हाला. पण तुम्ही लगेच निघालात तिथून "
" हा .. आज माझ्या एका friend चा बर्थडे आहे. म्हणून बारा वाजायच्या आत तिथे पोहचायच होतं, म्हनुनच लवकर निघाले"
खर तर हे होतं की दोन वर्ष्या मध्ये कधी चुकून सुद्धा तिच्या मैत्रिनिंचे वाढदिवस कधी लक्ष्यात राहिले नाहित आणी आज सर्व आठवणी मैत्रिणी, त्यांचा तो collage चा घोळका. सर्व काही आठवत होतं.
प्रशांत बरोबरची तिची वाढती मैत्री पाहून. तिच्या सर्व मित्रानी, मैत्रिनिनी तिला चिडवने सुरु केले होते.
अश्याच एका मस्करीतुन जन्माला आलेला वादने त्यांच्या मैत्रीवर घाव घातला होता. साधानच्या कोणत्याच मित्राला तिचा हा नविन फ्रेंड प्रशांत तेव्ह आवडत नव्हता का कुणास ठावुक पण जणू ते त्याच्या मध्ये असं काही पाहत होते की जे साधना कधीच पाहू शकत नव्हती. कदाचित प्रशांत तिच्याकडून काही वेगळ्या अपेक्षाही करायला लागला होता. आणी त्या मध्ये तिचे हे फ्रेंडस वाटेतला दगड बनत होते.
एका अश्याच बर्थडे पार्टी मध्ये साधना बरोबर आलेला प्रशांतने पिवून केलेला धिंगाना , साधनाच्या समोर तिच्या फ्रेंडसचा केलेला अपमान अजुन ही ताज़ा होता. जेव्हा मैत्री आणी तीच हे प्रशांत बरोबरच नाज़ुक नातं यांमधलं एक बंध तोड़न्याची वेळ आली तेव्हा तिने मैत्री तोडली.
अश्याच एका मस्करीतुन जन्माला आलेला वादने त्यांच्या मैत्रीवर घाव घातला होता. साधानच्या कोणत्याच मित्राला तिचा हा नविन फ्रेंड प्रशांत तेव्ह आवडत नव्हता का कुणास ठावुक पण जणू ते त्याच्या मध्ये असं काही पाहत होते की जे साधना कधीच पाहू शकत नव्हती. कदाचित प्रशांत तिच्याकडून काही वेगळ्या अपेक्षाही करायला लागला होता. आणी त्या मध्ये तिचे हे फ्रेंडस वाटेतला दगड बनत होते.
एका अश्याच बर्थडे पार्टी मध्ये साधना बरोबर आलेला प्रशांतने पिवून केलेला धिंगाना , साधनाच्या समोर तिच्या फ्रेंडसचा केलेला अपमान अजुन ही ताज़ा होता. जेव्हा मैत्री आणी तीच हे प्रशांत बरोबरच नाज़ुक नातं यांमधलं एक बंध तोड़न्याची वेळ आली तेव्हा तिने मैत्री तोडली.
" बसं इथेच थांबवा "
" are u sure ?" काहिश्या शाकिंक नज़रेने त्यानी विचारल. कारण एका माध्यमवर्गीय माणसां मध्ये आल्यावर नाक मुरडन्याची त्यांची ही सवय फार जुनी होती.
आणी श्रीमंतीचा फुकटचा आव आननारया मध्ये हा स्वभाव आपणहून येतोच.
आणी श्रीमंतीचा फुकटचा आव आननारया मध्ये हा स्वभाव आपणहून येतोच.
" हो ... इथेच "
"ओके ....बाय see u tommrow in office"
" yup bye "
असं बोलून साधना पुढे निघून गेली. आणी अविनाश गाडी वळवून त्यांच्या घराच्या रस्त्याला.
तिला अजुन ही विश्वास बसत नव्हता की तिचे ते सदानकदा ऑफिस मध्ये ओरडत असणारे बॉस होते.
गड़गंज श्रीमंत, पैसा घरी पानी भरत होता. त्यांची सौभाग्यकांक्षिणी या
ना त्या कारणाने पैश्याचा धाक धाकवन्यासाठी तत्पर असे. असो सध्या तरी साधना समोर एक नाविन आव्हान होते. दोन वर्ष्या नंतर आज ती त्यांना तोंड दाखवणार होती.
१५ जाने, २०१०
मनाचिये गुंती --- तीन
लखलखत्या, चमकदार मुंबईच खरं आणी साधं रूप पहायचं असेल ना. तर रवीवारी रात्री दहाच्या नंतर बाहेर निघावं. गेली सहा दिवस गर्दीतून घुसमटत श्वास घेणारे इथले रस्ते आज रात्री खर्या अर्थाने श्वास घेत असतात . असाच कसला तरी विचार शिवाजी पार्कच्या रस्त्याने चालताना साधना करत होती. गेल्या दोन वर्ष्यात तिने तिचे हरवलेले अस्तित्व. आज शोधायला सुरुवात केली होती जणू .
आज रविवार असून सुद्धा तिने आज त्याला मनापासून अनुभवला नव्हता आजचाच काय गेली कित्तेक रविवार फक्त प्रशांतच्याच नावावर होते. आणी आज पासून फक्त मी आणी फक्त मीच असे काहीसे धुसुर पण निराग्रही विचार साधना करत होती.
मध्येच एकटी वेड्यासारखी हसत होती तर स्वता भोवती एक गिरकी मारून दोन हाथ डोळ्यावर ठेवून लाजत होती. जणू आज तिच्या अपेक्षाना पंख फुठले होते, आणी या अपेक्षा दुसरया कोणावर अवलंबून नव्हत्या त्या तिच्या हक्काच्या होत्या.
ती आज जिंकली होती. स्वतावरच संशय घेउन आपण फक्त आपलाच आत्मविश्वास हरवून बसतो. प्रशांत तिच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजला पण त्याला तो वर्षाव सहन झाला नाही.
तो वर्षाव त्याच्यासाठी नव्हताच मुळी. आणी हेच तिला उमगल होतं जणू. मराठेंच्या आग्रहास्तव ती reception ला गेली. पण तिथे गेल्यावर तिला कोणत्या प्रकारची वागणूक मिळेल हे तिला माहीत नव्हतं. पण तरीही ती तिथे गेली होती,
कसल्याही प्रकारचा जाब तिला विचारायचा नव्हता. त्याला फक्त सांगायच होतं की
" thanks , दाखवून दिल्याबद्दल की तूझी प्रेम करण्याची लायकीच नाहीये".
हे ती बोलणार की नाही हे माहीत नव्हतं पण हो आवेग तर तोचं होता. तिथे गेल्या गेल्या साधनाला प्रशांतच्या बापाचा पैसा, त्याचं नाव, त्याची ख्याति जाणवली. आणी ती त्या मंडपात दिसली सुद्धा.
तो वर्षाव त्याच्यासाठी नव्हताच मुळी. आणी हेच तिला उमगल होतं जणू. मराठेंच्या आग्रहास्तव ती reception ला गेली. पण तिथे गेल्यावर तिला कोणत्या प्रकारची वागणूक मिळेल हे तिला माहीत नव्हतं. पण तरीही ती तिथे गेली होती,
कसल्याही प्रकारचा जाब तिला विचारायचा नव्हता. त्याला फक्त सांगायच होतं की
" thanks , दाखवून दिल्याबद्दल की तूझी प्रेम करण्याची लायकीच नाहीये".
हे ती बोलणार की नाही हे माहीत नव्हतं पण हो आवेग तर तोचं होता. तिथे गेल्या गेल्या साधनाला प्रशांतच्या बापाचा पैसा, त्याचं नाव, त्याची ख्याति जाणवली. आणी ती त्या मंडपात दिसली सुद्धा.
प्रशांतचा बापाने साधनाकडे हसून पाहिलं
"फार उशीर केलास यायला, प्रशांत कधीपासून तुझी वाट पाहत होता माहितीये"
"हो ....थोडं काम होतं मला तेच करून आले, काका ...अ...अ प्रशांत ...."
"तो काय तिथे पहुन्यानशी बोलतोय"
असं बोलून ते निघून गेले. पण प्रशांतची आई जणू साधनाशी लपाछपी खेळत होती तिने साधनाला तोंडं ही दाखवलं नाही.
प्रशांतचे भाऊ,बहिनिणी तर कधी साधनाला आपलसं केलच नव्हतं. त्यामुले त्यांच्या कापलावरच्या आठया काही
नविन नव्हत्या. ती पुढे होउन प्रशांतला भेटन्यास निघाली. तो अगोदरच काही पहुन्यान मध्ये busy होता. तरीदेखिल साधना पुढे होउन गेली.
" hi "
त्याने आगंतिक नज़रेने तिच्याकडे पहिलं
" hi , तू ....."
' हो ... मी का अजुन कोणी येणार होतं का?'
"नाही म्हणजे ..... तुझी ओळख करून देतो, ही माझी बायको नम्रता"
साधना थोड़ी हसली . एक जबरदस्तीचं स्मित देऊन ती म्हणाली
" hi "
तेवढ्यात नम्रता प्रशांतला उदेशुन म्हणाली
" हिची ओळख नाही करून देणार का ? "
" हो... हो.. का नाही नक्की , ही माझी.." थोडसं अड़खलतच त्याने उत्तर दिले '' माझी... मैत्रिण साधना "
साधनाकडे एक नज़र टाकुन त्याने उत्तर दिले. पण ती नज़र किहिशी झुकलेलीच होती.
हा तोच प्रशांत होता ज्याने मान वर करून एक दुर्मिल नजर टाकुन " माझं तुझ्यावर प्रेम आहे " असं बोलला होता. आणी आज तीच नज़र इतकी खाली.
आणलेला फुलांचा गुछं प्रशांतच्या हाथात देऊन साधना तिथून निघाली.
त्या अंधार्या रात्रीत जरी ती एकटी चालली होती तरी तिच्या सोबत होत्या त्या आठवणीं त्या आठवणी ज्या कधी तिच्या आयुष्यात प्रेमाची घुलुक घेउन आल्या होत्या.
सबंध महाविद्यालय साधनाच्या नावाचा उदोउदो करत होता. जिकडे पहावं तिकडे फक्त साधना होती. जूनियर पासून सेनिअर च्या तोंडात फक्त साधनाचेच नाव होते. कारण अंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत साधनाने त्यांच्या महाविद्यालयाला उच्च स्थानावर पोहचवले होते. विषय होता " मुली आणी भारतीय संस्कृति" हां विषय साधनाचा फार जवलचा होता. तिच्यावर शुभेछाचा पाउस पडत होता आणी त्यातूनच एक अभिनंदनाचा हाथ प्रशांतचा होता.
पण नंतर collage च्या बाहेर फाटकाजवळ आड़वून त्याने मला विचारलं
" अभिनंदन "
" अ....thanks पण मी ओळखलं नाही तुम्हाला "
" हो ....कसं ओळखनार , आपण कधी भेटलोच नाही. तसा मी तुमचा सेनिअर आहे "
" ओह ...ok "
त्याची नजर सैरभैर झाली होती. विचरायच काही वेगळ होतं आणी तो काही तरी वेगळ बोलत होता.
"मला थोड़ा उशीरच झाला आहे. मला जावं लागेल" साधना उत्तरली
" ok चालेल मी तुम्हाला सोडू का?"
" अं " काहीशी प्रश्नाकिन्त नज़रेने साधनाने उत्तर दिले " नाही नको ..... म्हणजे तुम्हाला कशाला त्रास"
" छे... हो त्यात कसला आलाय त्रास, जर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडलं की तेव्हडाच तुम्हाला समजुन घेण्यासाठी मला मला वेळ मिळेल, आणी ओळख ही वाढेल. नाही का ?"
त्याचे हे सहज बोलने साधनाला थोडेही खटकले नाही. कारण अशी सहज बोलणारी माणसं तिला आवडत असत.
"हो नक्की पण आत्ता नको, पुन्हा कधीतरी"
जास्त प्रश्न न विचारता प्रशंतने ही होकार दिला.
" हो चालेल पण एका अटीवर. उद्या तुम्हाला माझ्याबरोबर चहा-पाण्याला यावं लागेल."
तिने हसतं मान हलवली.
त्या रात्री रस्त्याने चालताना साधना जुन्या आठवणी ताज्या करत होती जणू त्या आठवणी आठवून त्या भुतकालातुन पूर्ण पने पुसून टाकायच्या होत्या. पण तिला हे माहीत नव्हतं की भूतकाळ कधीच माणसाचा पीछा सोडत नाही. तो पाठलाग करतच राहतो. जो पर्यंत तू त्यातून काही शिकत नाहीस तो पर्यंत. असच काहीसं आज रात्री तिच्या बरोबर घडणार होतं.
रात्रीचे ११.०० वाजले होते. रस्त्यावरच्या वाहनांची वरदळ कमी होती. तेव्हाचं तिच्या शेजारी एक मोठी कार येउन थांबली. तिला ही कार कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती. पण कुठे. ते उमगत नव्हते. कोण आहे आतमध्ये ?
का थांबली ही गाडी तिच्यासमोर ?
काही कळत नव्हते.
का थांबली ही गाडी तिच्यासमोर ?
काही कळत नव्हते.
----------
७ जाने, २०१०
मनाचिये गुंती ---- दोन

द्विधा हा शब्द मानुस हज़ारवेला हज़ारजागी वापरत असतो, पण येउन संपतो तो त्याच्या मनास्थितिवर. अश्याच द्विधा मनस्थितीत आज साधना सापडली होती. अश्या वेळेस हमखास मानुस बाकीचे कमी पडतात की काय तो स्वता:वरच संशय घ्यायला सुरुवात करतो, साधनाच्या बाबतीत हे असच घडत होतं. taxi तुन उतरताच, "मी उदास तर दिसत नाहीं ना," "माझे डोळे लाल झाले नाहीत ना""सराना काही समजल तर, मी काय उत्तर देऊ" अशे आणी अशे अनेक प्रशनांचा भडिमार ती स्वत:वर करत होती. आणी यासाठी बिल्डिंगच्या खाली असलेल्या सार्वजनिक नळ:च्या इथे जाउन तिने तिचे तोंड धुतले, थोडीशी ओढनी इकडे तिकडे करून, केसावर हलकासा हाथ फिरउन काहीही झालेले नाही मी रोज सारखी आज ही तीच साधना आहे हे दाखवण्याचा एक निरर्थक प्रयत्न करत होती , कारण नावाप्रमाणेच प्रोफ़ेसर. मराठे हे मुंबई विद्यापिठात मराठी भाषेचे प्राध्यापक होते, साधनाला पाहताच जर त्याना या सर्व गोष्ठी समजल्या नाहीत तरच नवल, नंतरची त्यांची फिलोसोफी ऐकण्याची मनस्थिति आज साधनाची नव्हती. म्हणूनच हे सर्व विकल्प साधनाने करून पाहिले.
थोड़ी कचरतच तिने दरवाज्यावर थाप मारली आणी तिथेच तिचा अपेक्षा भंग झाला, दरवाजा अधिपासुनच उघडा होता, तिला काहीही समजेना अत्ता काय करू सराना कसं सामोरे जाऊ, हा विचार तिच्या मनामधे चालत होता. उमभरठा ओलांडताना तिने तिच्या भिरभिरत्या नजरेतून मराठे सर कुठे बसले आहेत याचा निकष लावला, तेव्हाच एका कोपर्यत्ल्या: दहा वर वर्ष्य जुन्या टेबला जवळ पाठमोरे बसलेले मराठे सर दिसले. आजुबाजुला जिलेटीन पेपर्सची पडलेली घान त्याचबरोबर एक कात्री, अणि खेळन्यातले विमान अश्या गाज्यावाज्यात बसलेले मूर्तिमंत मराठे सर. ... होय मूर्तिमंतच कारण गेले ६ महीने एकच वस्तु पुन्हा पुन्हा अमेरिकेत असलेल्या नातवाला पाठवत होते. पण १५ दिवसातच ते gift पुन्हा return भारतातच येत होते. कदाचित पत्ता चुकीचा असावा, नाहीतर घरामध्ये कोणी नसावं अशी समजूत घालून ते पुन्हा ते gift तयार करण्यास सुरुवात करतात. आज ही हाच प्रयत्न चालू होता.
त्यांची नज़र चुकवून साधना आतमध्ये तिच्या रूम कड़े जाण्यास निघाली दोन पावले चालताच तिच्या कानावर काही शब्द येउन धड़कले, "थांब, काय झालं "
तिने काहीसं बीथरतचं मागे वळउन पहिलं, "अं... काही नाही"
"मग आल्या आल्या सुरु होणारी तुझी ती बडबड नाही, का सारखं हे gift मी पोस्ट करत असतो याच्यावरुन काही वाद नाही" छोटसं स्मित देऊन ते बोलले.
चोराला चोरी करताना त्याच्या हाताला पकडावं तशी परिस्थिति साधनाची झाली होती
"तुम्ही तुमच्या कामात मग्न होता म्हणून....."
"ते तर मी दररोज असतो, मग आज नक्की काय झालं"
"अं... मी जरा fresh होउन येते हं. नंतर आपन सविस्तर बोलू."
मराठेंच्या प्रशनाच उत्तर न देता काहीतरी बोलायच म्हणून साधना बोलून गेली. पण प्रो.मराठेना जणू काहीतरी झाल आहे याचा साक्षात्कारच झाला होता.
"प्रशांत बरोबरचा आजचा दिवस कसा गेला काही सांगितलं नाहीस तू मला" शेजारची कसलीतरी चिट्ठी उचलून ते म्हणाले, आणी काही क्षणातच साधनाला कलुन चुकलं की ती चिट्ठी प्रशांतच्या लग्नाची पत्रिका आहे.
सगळे शब्द तिच्या ओठांवर येउन थबकले होते, पण सर्व काही संगन्याचे धाडस तिच्याकडे नव्हते. ओठाबाहेर पड़न्यासाठी शब्द आतुर झाले होते. पण ते बाहेर पडत नव्हते. अश्यावेलेस प्रामुख्याने माणसाचे ओठ साथ सोडून देतात आणी डोळे बोलके होतात. साधनाच्या बाबतीत ही असेच झाले. तिच्या डोळ्यातून पड़नारया शब्द रूपी आसवानी सर्व काबुली देऊन टाकली होती
असच होतं जेव्हा आपण मनाला कुंपण घालून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे डोळे ते कुंपण तोडून सर्व काही सांगन्याचा प्रयत्न करतात . जे काही झालं ते सरांन पासून लपवून ठेवायच होतं पण प्रशांतने पहिल्यांदाच येउन सर्व काही संगीतालेल दिसत होतं.
परिस्थिति पाहता प्रो . मराठेनी फार काही न बोलता आतमध्ये जाउन एक ग्लास पानी घेउन आले पण तो पर्यंत साधनाच्या डोळ्यात असंख्य अश्रुनिं गर्दी केली होती. ती स्वताचे डोळे पुसन्याचा प्रयत्न करत होती पण जेव्ह्ड़े अश्रु पुसले जात होते तेव्हड़ेच अश्रु डोळ्यात दाटत होते. डोळ्यांखेरीज तिचे गाल , मनगट अश्रुंच्या ओघलानी ओले झाले होते. तिची ही अवस्था पाहून प्रो. मराठेना तिची किव आली.त्यानी तिच्या डोक्यावरून अलगत हाथ फिरवला. तिने आशेने मराठें कड़े पहिलं.
" रड... अगदी मनापासून रड"
सरांच हे अपेक्षापलीकडचं बोलणं ऐकून साधना स्तब्ध झाली
"जर तू माझ्याकडून सांत्वानाची अपेक्षा करत असशील तर ते मला जमणार नाही जेव्ह्डी बेभान होउन तू प्रेमात पड़लिस तेव्हडिच बेभान रडताना हो पण एकही अश्रु पश्चातापाचा असता कामा नये एव्हडिच माझी अट "
" सर यात माझी काय चुकी होती, मी माझ्या परीने जेव्ह्ड जमलं तेव्ह्ड देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला मग हे असं क घडावं ? " रडत, हुंदके देत पण एका वेगळ्याच आवेगाने ती बोलली.
" माणसाच हिथचं चुकत, प्रेम, मन, भावना या सर्व गोष्टीना मानुस एकाच जगेहून बघतो , पण या प्रतेक गोष्टीला निरखून पहिलं तर समजेल या पूर्ण पने स्वतंत्र आहेत.त्याना स्वतंत्र जागा आहेत."
"म्हणजे ?" साधना उत्तरली
" म्हणजे .....तूच बघ प्रेम करत रहिलिस. जेव्ह्ड देता आल तेव्ह्ड देत रहिलिस. पण जेव्हा प्रशांत कडून प्रेम घेण्याची वेळ आली तर तू उपेक्षित रहिलिस. कुठेतरी तुझा स्वार्थ जागा झाला असं नाही वाटत तुला"
साधना केविलवान्या नजरेने पाहत होती. अणि मराठे तिला पुन्हा साधनाच अस्तित्व प्रशांत शिवाय वेगळ आहे हे पटवून देत होते
" आपल्या मनसांकडून प्रेमाची अपेक्षा केली तर कुठे काय भीगडलं सर"
"नाही... यात काहीही गैर नाही !. पण जो मानुस तुझ्या प्रेमावर जगतो त्याच माणसाकडून प्रेमाची अपेक्षा करन कितपत योग्य आहे ते तू मला सांग, गेल्या दोन वर्ष्य:त तुम्ही एकमेकाना हज़ार वेळा I Love u म्हणाला असाल पण त्यामध्ये तुमची मन किती वेळा सहभागी होती हे सांगू शकशील"
साधनाची मान खाली होती, तिच्या डोळ्यातील अश्रुरूपी शब्द बोलके होऊ लागले होते. पण तेव्ह्डाच प्रयत्न ती रडू आवारन्याचा करत होती. नेमकं हेच प्रो .मराठेनी टिपल.
"कुठे गेली ती साधना जी स्वताच्या अस्तित्वासाठी, स्वताच्या स्वातंत्र्यासाठी, घरातून पलुन आली होती. तेव्हा विचार केला होतास की तुझ काय होइल किंव्हा तुझ्या घरात्ल्यांच काय होइल "
साधनाचा निरागस चेहरा पूर्णपणे सुकून गेला होता पण प्रा. मराठेच्या वक्तव्याने तिच्यातली मेलेली आशा पुन्हा जिवंत होत होती.
" तुझ्या प्रेमात जर काही खोट नव्हती तर का म्हणून तू रडतेस समज एका स्वप्नात होतीस तू आणी ते गोड स्वप्न मोडल गेलं. पुन्हा तुझं अस्तित्व शोधण्यासाठी मिलालेली ही संधी समजुन पुढे जा."
----------------
रात्रीचे आठ वाजले होते. रविवार असल्याने आजुबाजुच्या प्रतेंक घरा मध्ये रेलचेल चालू होती. पण इथे जणू अगरबत्तिच्या सुगंधा व्यतिरिक्त कुणाचाही वावर जाणवत नव्हता.
साधना फ्रेश होउन तिच्या रूम मध्ये असनारया खिडकीतुन एकटक पाहत होती तेव्हाच मराठे तिथे आले त्यांच्या हातात प्रशांतच्या लग्नाची पत्रिका होती.
" मला असं वाटतय की तू प्रशांतच्या लग्नाला जावस."
" पण तिथे त्याच्या घरातले ......"
" मग काय झालं जर प्रशांत पत्रिका देन्याच धाडस करू शकतो तर तू तिथे जाण्याचं धाडस करू शकातेसच ना. बघ सातचं लग्न होतं. तुला rception पर्यंत पोहचावं लागेल "
तिने होकारार्थी मान हलवली .
"
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)