३ मे, २०११

मनाचिये गुंती -----तेरा

प्रेम नकळत घडत, समजण्याच्या आतच नजरेपासून दुरही जात. जेव्हा जवळ असते तेव्हा त्याची किमत नाही समजत... दूर गेल्यावर त्याच्या दुराव्यात अश्रू ढाळन्यापालीकडे माणूस काही करू शकत नाही.  ती वेळ ती स्थिती माणसाला मरणाच्या यातना देवून जाते.... काहीस असच अविनाश आणि साधनाच्या आयुष्यात घडलं, प्रेम झाल पण नकळत पण समजताच ते तितक्या दूर हि गेलं. आज कुठे आहेत ते.....
 सहा महिने उलटले जग जिथल्या तिथे पण अविनाश त्याही जगाच्या पलीकडे कुठेतरी साधनाची वाट पाहत. त्या रात्री पार्टीनंतर नंदिनिशी झालेलं ते भांडण छे.. छे .. भांडण नव्हे ते तर दोघांनीही एकमेकांना दिलेली समजूतदार नात्याची पोचपावती  होती 

"जे काही झाल त्यात साधनाची काहीही चुकी नाहीये ...काही वेळपर्यंत तर मीही या सत्य पासून अन्भिग्न होत कि मी साधनावर प्रेम करतो "काहीश्या अपराधी भावनेने मान खाली घालून अविनाश नंदिनीला सांगत होता. आणि नंदिनी फक्त शांत पणे हे सर्व ऐकत होती.. "नंदू .. तूच बोल ... तीन वर्ष्याच्या आपल्या संसारात एक तर तू होतीस नाहीतर मी एकत्र आपण कधीच नव्हतो का अस व्हाव हा संसार तडजोडीवर  उभा होता .प्रेमावर कधीच नाही मग आपण एकत्र राहण किती योग्य आहे " 

  "काय बोलायचं तरी काय तुला " नंदिनी उत्तरली .
'हेच कि आपण वेगळे होऊया". अविनाश सहज पणे बोलून गेला पण नंदिनी काहीही न बोलता तिथून निघून गेली.


रात्रभर ती या गोष्टीचा मागोसा घेत होती कि तीच काय चुकल अविनाशच मन जिकण्यासाठी ती कुठे कमी पडली. भिजलेल्या डोळ्यांनी ती रात्र संपली आणि सकाळी अविनाश समोर येवून तिने वेगळ होण्याच्या त्याच्या निर्णयाला दुजोरा दिला" 

त्यानंतर आज सहा महिन्यानंतर न अविनाश साधनाला भेटला ना साधना अविनाशला. कुठे गेली ती का भेटत नाहीये ती मला, मी तिच्यासाठी सर्व काही सोडून आलो पण ती ..... समुद्राच्या त्या संथ लाटांकडे पाहून तेव्हड्याच आवेगाने  अविनाश विचार करत होता. मराठेंकडे विचारपूस केली पण त्यांनीही काहीही सांगायला नकार दिला. काही पर्याय उरला नव्हता तिला भेटण्याचा.... 


तेव्हड्यात त्याला आठवलं साधनाच गाव तीच घर, तिची माणसं.. कश्यावरून ती तीथे गेली नसेल. मनातील घालमेल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या गावी जन योग्य आहे कि नाही याचा तो विचार करत होता पण त्याच्याच मानाने उत्तर दिल, आत्ता नाही गेलो तर कधीच नाही जावू शकणार जर विधात्याच्या मनात असेल तर आम्ही भेटूच पण त्यासाठी करावी लागणारी मेहनत विधात्याला नाही मलाच करावी लागणार.


तिथून उठताच तो घरी गेला. पण हे घर ते नव्हत जिथे तो नंदिनी बरोबर राहत होता हे ते घर होत जिथे तो लहानाचा मोठा झाला. जिथे त्याच्या आई वडिलांनी त्याला या जगात जगायला शिकवलं होत. माणूस म्हणून जगात कस वावराव हे समजावून सांगितल होत पाहिलं पावूल, पहिले बोबडे बोल, जिथे उमटले तिथे तो सहा महिन्यापूर्वी पुन्हा आला होता


घरात येताच त्याच्या रूममधील पडलेली काही अस्तावेस्त कागद पत्रे तो चाचपडू लागला . त्याचा हा आताताईपणा  पाहून त्याची आई थोडीशी घाबरली जणू तिला भीती होती कि आपला मुलगा आपल्याला सोडून पुन्हा जाणार तर नाही ना.म्हणूनच न राह्वाता तिने विचारल 
"काय झाल  अवी... काही प्रोब्लेम" 
त्याने मागे वळून पाहिलं .. त्याची आई तिथे होती तिची ओघळती नजर पाहून त्याने तिला झालेला सर्व प्रकार सांगितला 

थोडा वेळ स्तब्ध राहून त्या माउलीने साधनाला पाहण्याची इच्छा दर्शविली "खर्च अवी मला तिला पाहायचं.. अशी कोण ती मुलगी जिने तुला माणूस बनविल मला पहायचं तिला "

"हो आई .. मी तिचा तो पत्ता शोधतोय पण सापडतच नाहीये. तेव्हड्यात त्याच्या हाथात एक फाईल आली ज्यामध्ये त्याच्या काही स्टाफ चे resume होते . ती फाईल घेवून तो टेबलाजवळ आला आणि त्या मध्ये साधनाचे resume शोधू लागला. आणि तो भेटला ....... त्यावर तिचा गावातला पत्ता लिहला होता.

त्याने खुश होऊन आई कडे पाहिलं ... "मला जाव लागेल तिच्याकडे ...तिला आणायला "


हे ऐकताच  दरवाज्याशेजारी उभे असणारे अविनाशचे वडील थोड्या वेळासाठी थबकले. अविनाशने व तिच्या आईने त्यांच्याकडे पाहिलं . आणि काहीही न बोलता आपला चष्मा पुसत ते तिथून निघून गेले. आईने नजरेने  खुणवून बाबाना समजवण्यास सांगितले. .. आणि बाबाण पाठोपाठ अविनाश हि  निघाला   


बाहेर परसात बाबा बसले होते. त्यांच्या जवळ जावून अविनाश हळूच बोलला
 "अरे... हे काय . हे जास्वंदीच झाड किती मोठ झाल ना ... बाबा जेव्हा फुलं येतात तेव्हा फार बर वाटत असेल ना कि आपण या झाडाला मोठ केल, फुल देण्यास आपण समर्थन केल म्हणून....
" नाही!"  अविनाशकडे पाहत बाबा बोलले
 "त्याच्यापेक्षाहि जास्त दु:ख  तेव्हा होत. जेव्हा ती त्या झाडाची पान फुल झडायला सुरुवात होते. कारण माहित असत कि या वेदना काही क्षणापुर्त्या असतात पण त्या झाडाला कोण सांगणार त्याच्या वेदना कोण झेलणार किती हि पाणी घालून मोठ केल तरी त्याच्या वाट्याला आलेल्या वेदना त्यालाच झेलाव्या लागणार मला नाही" हे ऐकताच अविनाशला कळून चुकल हा टोमणा होता त्याच्या भूतकाळाला.

"बाबा .. ती माझी घोडचूक होती . त्याबद्दल मी माफी मागितली आहे. माहिती आहे तुमच्या मनात अजूनही कुठे तरी एक बोचणी आहे कि मी तुम्हाला माझ्या स्वप्ननसाठी सोडून जाईन. हो ना..! "

केविलवाण्या नजरेने बाबानी  त्याच्याकडे पाहिलं :"माझ काही नाही रे तुझ्या आईच काय ती कशी जगेल "
अहो पण मी तुमच्यासाठीच जातोय साधनाला आणायला please  बाबा मला  एक संधी द्या . मी लवकरच येईन "
एक नजर वरती गच्ची वर उभी असणारी अविनाशची आईकडे पाहत बाबांनी अविनाशला होकार दिला. आणि डोळ्यातले पाणी पुसत अविनाशला मिठी मारली........दोन बापाला आणि मुलाला अस पुन्हा एकत्र आलेल पाहून अविनाशच्या आईने सुठ्केचा निश्वास सोडला कारण ती या दिवसाची वात फार पूर्वी पासूनच पाहत होती. 



पुढील भाग लवकरच   ....