२० मार्च, २०१०

मनाचिये गुंती ---- अकरा

"किती हास्यास्पद आहे हे सर्व.  ज्या मुलीबरोबर आयुष्याची सुखी स्वप्न पहीली आणी आज तिच्या आणी माझ्या लग्नाचा वाढदिवस असून सुद्धा मी विसरलो. किती वाईट आहे हे सर्व" 

पार्टी ला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत तो या सर्व गोष्टींचा विचार करत होता. तेव्हड्यात त्याची नजर नंदिनी कड़े गेली.
तिच्या तोंडावर असणारे हसू किती नैसर्गिक आहे आणी किती स्वताहून हासन्याचा व खुश राहण्याचा प्रयत्न आहे त्याचा थांग पत्ता लागत नव्हता.
"नंदिनी खरच माझ्याबरोबर खुश आहे की फक्त खुश राहण्याचा प्रयत्न करत आहे. मला तर कधीच तिच्याबद्दल एक वेगळ असं फील झालं नाही मग हे आहे तर काय ? मंगलसूत्र घातलं म्हणून अयुश्याभर त्या व्यक्ति बरोबर रहायच ज्याच्या बद्दाल थोड ही आकर्षण नसावं."

"सर "  गोंधळवून  अविनाशने आवाजाच्या दिशेने पाहिले. " साधना...!  "  साधनाला पाहताच अविनाशच्या डोळ्यात एक वेगळीच  चमक दिसली . साधनाला ही ती जाणवली.

" अ  अ .. थोड़ा उशीरच झाला सॉरी "

"इट्स ओके ... ये .. सर्व स्टाफ आला आहे . तुझीच कमी होती."

अविनाश साधनाला घेवुन आत गार्डेन मध्ये येतो जिथे ही पार्टी चालली होती. सर्वांच्या भेटी गाठी होत होत्या. साधनाला  पाहून सर्व जन खुश झाले. पण नंदिनी का कुणास ठावुक हे सर्व पाहत असताना खुश नव्हती. जेव्हा अविनाश तिथे साधनाला घेवुन आला तेव्हा नंदिनी  साधनाकड़े टक लावून पाहत होती.

"नंदिनी ही साधना आपल्या साप्ताहिकाची सर्वात लोकप्रिय लेखिका" अविनाशने त्याच्या परीने ओळख करून दिली.

 " हो ..... माहितीये .. hi .. कशी आहेस." थोडसं तुस्ड़ेपणाने नंदिनी बोलली.

" बरी आहे ... तुम्ही कश्या आहात.."

हे सर्व चालू असताना अविनाशचे सर्व लक्ष्य साधनाकड़े होते. तीच सहज बोलन काही दिवसानपूर्वी त्याला आवडत नव्हते पण आज तो प्रतेक्क शब्द जो तिच्या ओठातून बाहेर पडत आहे. तो गोड वाटत होता.



तेव्हड्यात अविनाशच्या काही मित्रानी त्याला हाक मारली आणी तो त्या दिशेने गेला.

" सो ... साधना फार ऐकले तुझ्याबद्दाल तुझ्या कामाबद्दल, तुझ्या बोलन्याब्द्दल आणी हो तुझ्या सौन्दर्याबद्दल ही ...."
काहिश्या भुवया उंचावुन नंदिनी हे सर्व बोलत होती. साधना तशी साजस आणी सधी मुलगी आणी हे तिच्याकडे पाहून लगेचच समजावून येत होतं .

" हो .... थैंक्स अगदीच तसच नाही. जे माझ काम आहे तेच मी करत असते." साधनाने हसतच हे उत्तर दिले.

"ह्म्म्मम्म्म्म ... actuly  तसं तुझ्या बोलण्याचा प्रभाव हा आमच्या यांच्यावर ही जाणवू लागला आहे."
साधनाने लगेचच अविनाशकड़े वळऊन  पाहिले. तर तिला ही ते जानवलं अत्तापर्यंत फक्त स्वताला पैश्याच्या मोजमापात मोजनारे अविनाश जरा वेगलेच दिसत होते.

"साधना...!" जरा स्वर वर करून नंदिनी बोलली .
साधनाने थोडं दच्कुनच पाहिलं

"मला माहित नाही ... पण तू आणी अविनाश नाक्कीच काहीतरी....."

"प्लीज्ज़ काय बोलताय हे ... ते फक्त आमचे बॉस आहेत. त्या पलिकडे ना त्याना माझ्याबद्दल काही माहिती आहे आणी ना मला त्यांच्या बदल"

" ते मला समजत .... मीच नव्हे ऑफिस मधले फार लोक तुम्च्याब्द्दाल बोलत असतात."


" मी  त्यांची  बायको  असून सुद्धा त्याने कधी माझा शब्द पडू दीला नाही आणी तुझ तत्वज्ञान  तर ते फार चवीने ऐकतात. हे बग तुझ्या बद्दाल मला जास्त माहीत नाहिये पण इकडे माझ्या संसारात आडकाठी घालण्याचा प्रयत्न ही करू नकोस "

साधनाचा चेहरा  हे सर्व ऐकताना  रडवेला झाला होता. इथे येताना तिने कधीच हा विचार नव्हता केला की नंदिनी तीच स्वागत असं करेल.

हे सर्व बोलून नंदिनी तर तिथून निघून गेली पण साधनाच्या कानात हे शब्द एखाद्या ज्वलंत आगि सारखे कानात घोलत होते. तिने तिथून कुणालाही न संगता जाने ठीक समजले.

-------------

घरी उशिरा येइन म्हणून सांगुन गेलेली साधना इतक्या लवकर घरी येईल असं प्रो . मराठेना वाटलं नव्हत.
तिचा चेहरा पाहून त्यानी तर्क लावण्याचा प्रयत्न केला. पण सर्व काही फोल ठरलं.

"काय झालं काही प्रॉब्लम ..." 
पण साधना काहीही न बोलता घरात आली अणि खुर्चीवर बसून ढसा ढसा रडू लागली