२५ फेब्रु, २०१०

मनाचिये गुंती - नऊ

साधना अविनाशच्या  केबिन कड़े जाण्यास निघाली.
अविनाश फोन वर बोलत होता. फोनवर बोलता बोलता त्याने एक नज़र त्याच्या दिशेने येनारया साधनाकड़े पाहिलं. आणी का कुणास ठावुक त्याची नजर तशीच तिच्या मूर्तिमंत चेहरयाकड़े पाहत राहिली . कदाचित साधनाला ही ते जाणवलं असावं. म्हनुनच की काय ती सुध्हा थोड़ी लाजरी बुजरी झाली. ती काही बोलणार तेव्हड्यात अविनाशने तिला नजरेने आत येण्याचा इशारा केला. ती आत जावून खुर्चीत बसली. तेव्हड्यात तिचं लक्ष्य तिथेच असलेल्या गुलाबाच्या फुलांवर गेले. आणी थोड़ी ती हसली


  तिला कालचा सर्व प्रकार आठवला. तिने फक्त तिचे विचार मांडले होते. पण हे विचार एखाद्या व्यक्तीमध्ये एव्ह्दा बदल घडवून  आनु शकतात. हे तिला पटत नव्हते.




कसे पटणार ?  तिला कधी तिची स्वताची ओळख पटली नव्हती. प्रशांतच्या कारणाने ते ही जामुन आले होते. असो ती थोड़ी प्रसन्न मनाने अविनाश समोर गेली. काल रात्री बसून पूर्ण केलेला लेख त्याच्या समोर ठेवला. कदाचित काल भेटलेला ओरडा ती विसरली असावी. नाहीतर  हे  असे धाडस!


" मिस . साधना" अविनाश ने तिचे लक्ष वेधून आणी हाथातला फोन खाली ठेवून तिच्याकडे पाहिले
" काल मी तुमच्या विचारांवर फार विचार केला. कदाचित तुमच्या या विचारांचा आपल्या साप्ताहिकाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, अहो मिळेल काय !  मी आपल्या वाचकांकडून आलेल्या सर्व पत्रांचा मागोवा घेतला, तुमच्या मागच्या स्तोर्य्ला छान प्रतिसाद येतो आहे."


साधना हसून बोलली. " मिळनारच  सर" त्याने तिच्याकडे साशंक नज़रेने पाहिले.  " अहो .. आजकाल लोकांना सत्या हवं असतं, आपले विचार त्यांच्यावर आत्तापर्यंत लाद्त होतो जे कधीच आपल्या आयुष्याचा घटक नव्हते . त्याना जेव्हा तुम्ही त्यांच्या मनाचं प्रतिबिंब दाखवाल. तेव्हा ते कुठे तरी आपल्याला आपल्या सप्ताहिकाला त्यांच्या घरात स्थान देतील."


साधना बोलतच जात होती. आणी अविनाश फक्त ऐकत होता.
" जो पर्यंत आपण स्वताला स्वताच्या नज़रेतुन पाहत. नाही तो पर्यंत तुम्ही दुसरयाला त्याच खरं रूप दाखवू शकत नाही. even  मी म्हणेन की तो तुमचा हक्कच नाहिये."


" अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की काल आपल्यात जे सवांद झाले ते तुम्ही तुम्हाला पड़तालुन नंतर माझ्याशी शेयर केलेत. का ? याचा अर्थ काही दिवसांपूर्वी ची साधना कोणी वेगळी होती. आणी ही कोणी वेगळी आहे. हो का ?"


साधना गड़बडली तिच्याकडे याचं काही उत्तर नव्हते.


" नाही अगदीच असं नाही."
"मग कसं ? " साधना च्या डोळ्यात डोळे घालून, तिच्या प्रश्नाकित नज़रेला नज़र भिडवून अविनाश बोलले.


तेव्हड्यात तिथे साठे आले . प्रभाकर साठे हे आमच्या ऑफिस मधले  एकमेव लेखक असे आहेत की ज्यांच्या खाजगी आयुष्याचा आणी त्यांच्या profetional लाइफ वर कधी प्रभाव पडत नाही .


" सर ते काही पेपर्स वर तुमची सही हावी होती."
काही वेळ त्या पेपर्सवर नजर फिरवल्यावर त्यानी पेनसाठी साठेंच्या दिशेने हाथ फिरवला तोच त्यानी खिशातला पेन काढून अविनाश समोर ठेवला. अविनाशने  पेपर्स साइन करून दिले. आणी हा सर्व प्रकार साधना समोर होत होता. साठे पेपर्स घेवुन निघून गेले. पण साधना तिथेच होती. थोडीशी फिरकी घेत अविनाश साधनाला बोलले.


" काय माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलत अजुन "
साधना हसून बोलली


" एक सांगाल सर "
" हं ...बोला "
" तुमच्या या डेस्कवर ऐव्हाड़े पेन पडलेले आहेत तरीही तुम्ही साठें कड़े पेन का मंगितलात यात्लाच एक का वापरला नाहित."
" अहो ते इम्पोर्टेड पेन आहेत.असे छोट्या मोट्या कामासाठी काय वापरायचेत"


साधना अपेक्षित असलेल्ल्या उत्तराने खुश झाली.


"अ अ अ .... काय बोललात इम्पोर्टेड पेन .... छोटी मोठी कामं .. मागच्या वेळेस यातला एक तरी पेन तुम्ही कधी वापरला होता सांगू शकाल ?"


अविनाशच्या चेहरा प्रश्नाकित झाला होता.


" नाही ना.. अहो ज्या वस्तुच काम जे आहे ते त्या वस्तुला करावं लागणारच त्याशिवाय गत्यंतर नाही. कितीही महागडी वस्तु असो, तिचा गुणधर्म जर वेळ प्रसंगी माणसाला उपयोगी पडला नाही तर तिचा काय उपयोग. आपण तर साधी मानसं आहोत जेव्हा आपल्याला समजतं की आपण चुकतो आहोत तेव्हाच आपन ती चुक सुधरव्न्याचा प्रयत्न करतो नाही का . चुकीच्या आधी आलेल्या  शहानपनापेक्षा त्यानंतर आलेल्या शहानपनाला  महत्त्व अधिक असतं कारण तिथे अनुभव लपलेला असतो."


अविनाश पूर्ण पने साधनाच्या बोलण्यात मंत्रमुग्ध झाला होता. इतक्या वेळा ही मुलगी आपल्या समोरून गेली होती. पण तेव्हा कधी ही नजर वर न करता या मुलीने पाहिलं नव्हतं आणी अत्ता तीच नजर इतकी तीष्ण होवून नज़रेला भिडू पाहतिये.


साधना तिच्या शब्दात इतकी गुंग झाली होती की तिला कळत  ही नव्हतं की ती जे काही बोलते आहे ते अविनाशच्या डोक्यात तरी जात आहे का?


" आहो जर हे पेन तुम्ही तुमच्या त्या जुन्या प्लास्टिकच्या फूलन सारखेच फक्त शो पिस म्हणून ठेवणार असाल तर ठीक आहे. कारण कितीही महागडे शो पिस आणून ठेवले तरी फक्त त्या जगेचं सौंदर्य वाढतं पण माणसाच्या मनाचं काय त्याचं सौन्दर्य तर पैश्यात मोजता येत नाही."


" मला काहीही कळत नाहिये. म्हणजे ... हे कळते आहे की तुम्ही काय बोलत आहात पण या सर्व गोष्ठी आपल्या आयुष्यात कश्या काय उतरवणार . its realy too difficult ."


"का .. यात अवघड ते काय. मला सांगा. आज तुमच्या टेबलावरची ही गुलाबाची फुले त्याजागी कालपर्यंत ती प्लास्टिकची फुलं होती. असं का? काल मी म्हणाले म्हणून की अजुन काही ? "


" हो...... काल तुम्ही जे काय बोललात ते मला पटलं. even मी घरी जावून  या सर्वाचा विचार सुद्धा केला."


"वेगळ! ..." एकदम कुत्सित हास्य देवून अविनाश ने विचारलं.


" ह्म्म्मम्म .. म्हणजे तुम्हाला या फुलांमधून एक वेगळ असं. जे शब्दात वर्णन करता येणार नाही, असं काही जाणवलं  नाही. एक नैसर्गिक पण तेव्ह्डाच आत्मिक आनंद देनारं काहीतरी"


" नाही ,,, असं काही जनावुन घेन म्हणजेच टाइमपास  आहो आपण मानसं आहोत जगातल्या बाकीच्या प्राण्यांनपेक्षा आपल्याला कितीतरी पटीने चांगली  देवाने  विचार करण्याची शक्ति दिली आहे. तुम्ही बोलताय तसं करायला लागलो तर तुम्हाला नाही वाटत. काही दिवसानी आपल्याला जंगलात जावून राहावं लागेल."


साधना फक्त मुक्त पने थोडीशी गालातल्या गालात हसली.


" का? .. काय चुकीचं बोललो मी जर असच आहे तर तुम्ही सांगा काय बोलतात ही फुलं काय सांगतात ही फुलं जे तुम्ही एव्हड खुश होता. त्याना पाहिल्यावर " थोडेशे पुढे येउन आणी तेव्ह्डेच गडबडून अविनाश म्हणाले ........