१ जाने, २०१२

या वर्षाचा पहिला दिवस.....



सर्वकाही तथास्थू असताना त्यातही काही तरी नवेपण शोधण्याचा माणसाचा जो स्वभाव असतो तो प्रामुख्याने या दिवशी दिसतो .... सर्व काही नवीन... मग ती स्वप्न असो वा जगण्याचा नवा ध्यास ,   नको काही जुनं... जे काही घडलं त्यात काय वाईट काय चांगल  याचं  मोजमाप करून पुढे जाणे यातच सर्वांना   धन्यता वाटत  असते. पण सरत्या वर्ष्यामध्ये कितीतरी गोष्टी जुन्या असून सुद्धा पुढे तेव्हड्याच नव्यान चालू राहतात. मग ती गेल्या वर्ष्यात कोणाबरोबर झालेलं भांडण असो वा, कोणा बरोबर जोडलेलं नातं असो .या दिवशी सर्व साधारण माणूस जगण्याची नवी दिशा शोधत असतो. प्रामुख्याने दिवाळी, दसरा, ईद, नाताळ, या दिवशी हि माणूस तेव्हड्याच आनंदाने सर्व विसरून स्वताला समाजामध्ये उभा करू पाहत असतो. पण या दिवशी कोणी एका धर्माची लोक पुढे येत नाहीत , पुढे येतो  तो माणूस ...आणि त्यामुळेच  माझ्यासाठी हा दिवस तेव्हडाच महत्वाचा जेव्हडी दिवाळी , ईद  आणि नाताळ. 


हा आजचा दिवस साजरा करण्याचे प्रतेक्काचे वेगवेगळ्या कल्पना असतात .कोणी हा दिवस बाकीच्या दिवसांपेक्षा वेगळा बनवण्यात व्यस्त असतात तर काहीजण  मित्रपरिवारासोबत   सुट्टी  आनंदाने आणि 
मोकळ्या मनाने  घालवत असतात .

  माझ्यासाठी आजचा हा दिवस स्वताला UPDATE करण्याची एक संधी असते म्हणूनच मी एका जागी शांत बसून गेल्या वर्ष्याच्या आठवणीना नव्याने आठवत असतो . काही बिनसलेल्या गोष्टीना नीट मार्गावर कश्या पद्धतीने आणता येईल, काय गमवल  काय मिळवलं , काय भेटायला हवं होत पण भेटू शकल नाही.... कुठे मी कमी पडलो, हातातून झालेल्या चुका नवीन वर्ष्यात होऊ नये म्हणून स्वतामध्ये काय बदल करू शकतो ..... अश्या आशयामध्ये स्वताला निरखून पाहण्यात माझा पहिला दिवस निघून जातो आणि येतो तो नवीन हुरूप घेवून नवीन ऊम्मेद, नवीन दिशा , नवीन संकल्प, नवीन विचार.

गेल्या वर्ष्यात झालेल्या घडामोडी मग त्यां वयक्तिक असो वा सामाजिक.  आपल्या विचारांना  समतोल वागणूक दिली कि,  स्वताला पडताळणे तेव्हडेच सोप होवून जातं. असाच काहीतरी माझ्याबाबतीत दरवर्षी घडत असतं. या वर्षी संकलक म्हणून मला तीन वर्ष पूर्ण होतील  आणि या तीन वर्ष्यात या क्षेत्रातला आलेला अनुभव माझ्यासाठी फार अनमोल आहेच तसेच या क्षेत्रातला खराखोटेपणा पडताळण्यात  या वर्षी मला खऱ्याअर्थाने  यश आले, वाशीच्या रघुलीला मॉल मध्ये अवाजावी दारामध्ये विकल्या जाणाऱ्यां पीण्याच्या पाण्याच्या बाटली साठी मी आणि माझ्या मित्रांनी याच वर्षी पहिल्यांदाच ग्राहक मंचात केलेली तक्रार..... याचा उपयोग म्हणावा तसा झाला नाही पण मनाचे समाधान तेव्हडे झाले.

तसं काही कटू तर काही चांगल्या आठवणीने माझं हे वर्ष संपल आता  ध्यास आहे तो नाविन वर्ष्याचा  पाहुया हे वर्ष आपल्या पिटारयातून  माझ्यासाठी काय भेटवस्तू  आणल्या आहेत त्या......

तुम्हा सर्वाना नूतनवर्ष्याच्या हार्दिक शुभेछ्या